आजच्या परिस्थितीत पैसे गुंतवण्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड एक उत्तम पर्याय आहे.
प्रतिनिधी
PPF Scheme Latest Update: पीपीएफ स्कीम (PPF Scheme) मध्ये पैसा गुंतवणाऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजन राबवल्या जातात. जर तुम्ही पीपीएफ योजनेत पैसे लावले असतील, तर तुम्हाला आता तब्बल ४२ लाख रुपये मिळणार आहेत. आजच्या परिस्थितीत पैसे गुंतवण्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला सरकारकडून पैशांची हमी मिळते. शिवाय चांगला परतावाही मिळतो. If money is invested in PPF scheme, then government is giving full 42 lakh rupees
दीर्घकाळ गुंतवणूकीसाठी योग्य पर्याय –
PPF Scheme दीर्घ काळ गुंतुणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही यामध्ये दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. यामध्ये तुम्हाला कम्पाउंडिग व्याजाची सुविधाही मिळते. याचबरोबर शेअर मार्केटच्या चढ-उताराचा यावर काहीच परिणाम होत नाही.
कशाप्रकारे मिळणार ४२ लाख रुपये –
जर तुम्ही पीपीएफ स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला ५ हजार रुपयांची गुंतवणूक करत असाल तर तुमची पूर्ण वर्षाची गुंतवणूक ६० हजार रुपये होईल. जर तुम्ही १५ वर्षांसाठी ठेवी ठेवत असाल, तर मॅच्युरिटीच्या वेळी तुमचा पैसा १६,२७,२८४ होईल. जर तुम्ही डिपॉझिटला पाच-पाच वर्षांच्या टर्ममध्ये पुढील दहा वर्षांसाठी वाढवत असाल, तर २५ वर्षानंतर तुमचा फंड जवळपास ४२ लाख(४१,५७,५६६ रुपये) होईल. यामध्ये तुमचे योगदान १५,१२,५०० रुपये आणि व्याजावरील मोबदला २६,४५,०६६ रुपये होईल.
कशाप्रकारे ही स्कीम सुरू करू शकता? –
पीपीएफ स्कीममध्ये तुम्ही किमान ५०० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तुम्ही हे तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेतूनही सुरू करू शकता. १ जानेवारी २०२३ नंतर सरकार या स्कीममध्ये ७.१ टक्के दराने व्याजाचा फायदा देत आहे आणि पीपीएफ स्कीमची मॅच्युरिटी १५ वर्षांत होते आहे.
If money is invested in PPF scheme, then government is giving full 42 lakh rupees
महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी हिंडेनबर्ग अहवाल फेटाळला : म्हणाले- अदानी समूहावरील अहवाल केवळ आरोप; दोषी सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष
- भारतात होणार छोट्या विमानांची निर्मिती : एम्ब्रेयर आणि सुखोईच्या उत्पादनासाठी चर्चा, दुर्गम भागात होणार फायदा
- द फोकस एक्सप्लेनर : भारतात नव्या व्हायरसचा धुमाकूळ, काय आहे H3N2? खोकल्यावर सिरप-औषधेही कुचकामी, वाचा सविस्तर
- गुंतवणूकदारांचे नुकसान करून पैसे कमावणे हे हिंडेनबर्गचे काम : ज्येष्ठ वकील हरीश साळवे म्हणाले- हिंडनबर्ग अहवालाची चौकशी गरजेची