• Download App
    आजादी का अमृत महोत्सव : ICHR च्या डिजिटल पोस्टरवर पंडित नेहरूंचा समावेश नसणे "नेमके कोणाला" खटकलेय? ICHR digital poster didn't published Pt. Jawaharlal Nehru's photo

    आजादी का अमृत महोत्सव : ICHR च्या डिजिटल पोस्टरवर पंडित नेहरूंचा समावेश नसणे “नेमके कोणाला” खटकलेय?

    विनायक ढेरे

    नाशिक : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना केंद्र सरकारने देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव आणि सन्मान वाढविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च (ICHR) या संस्थेने एक डिजिटल पोस्टर प्रकाशित केले आहे. हे पोस्टर वादग्रस्त ठरविण्यात आले आहे. ICHR digital poster didn’t published Pt. Jawaharlal Nehru’s photo

    या पोस्टरवर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो नाही. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार वल्लभ भाई पटेल आदींचे फोटो या पोस्टवर आहेत. यावरून सोशल मीडियामध्ये जोरदार घमासान सुरू आहे. सावरकरांचा फोटो यात असणे काँग्रेस निष्ठांना खटकले आहेच, पण त्याचबरोबर पंडित नेहरुंचे पोस्टरवर “नसणे” हे अधिक खटकलेले दिसते…!!



    परंतु गेल्या काही तासांमध्ये सोशल मीडिया वरच्या प्रतिक्रिया बारकाईने बघितल्या किंवा त्यातले between the lines वाचले तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे काँग्रेसमधल्या फक्त नेहरू-गांधी गटाच्या नेत्यांनाच पंडित नेहरूंचा फोटो ICHR च्या डिजिटल पोस्टरवर नसण्याचे खटकले आहे. नेमक्या कुणी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात हे पाहिल्यावर ही बाब लक्षात येईल. पी. चिदंबरम, शशी थरूर, जयराम रमेश, गौरव गोगोई या काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. त्याच बरोबर इतिहासकार रामचंद्र गुहा, ब्रिटिश फिल्ममेकर आतिष तासीर, पत्रकार स्वाती चतुर्वेदी या काँग्रेसनिष्ठ परंतु काँग्रेसबाह्य व्यक्तींनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

    त्यातही यातला बारकावा आणि नेमकेपणा लक्षात घेतला तर एक बाब स्पष्ट होते, की काँग्रेसमधल्या अन्य कोणत्याही नेत्याने अथवा कार्यकर्त्याने डिजिटल पोस्टरवर नेहरू “नसण्याच्या” विषयाला हवा दिलेली नाही. ज्यांचा जनतेशी संबंध आहे, संघटनेशी संबंध आहे अशा कोणत्याही नेत्याने हा विषय लावून धरलेला नाही. काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ज्या जी – 23 नेत्यांचा आग्रह चाललेला आहे त्यांनी देखील या विषयाला हवा दिलेली नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, काँग्रेसमधल्या नेहरू-गांधी निष्ठा (अर्थात महात्मा गांधी नव्हे) नेत्यांनी इतिहासकारांनी आणि पत्रकारांनी फक्त ICHR च्या डिजिटल पोस्टरवर नेहरू “नसण्याला” प्राधान्य दिले आहे. हे सर्व नेते आणि विचारवंत, पत्रकार गांधी घराण्याचे लाभार्थी आहेत. हे सांगण्यासाठी कोणत्याही वेगळ्या राजकीय तज्ञाची गरज नाही.

    याचा अर्थ असाही होतो की आता पंडित
    नेहरुंची लोकप्रियता एवढी व्यापक उरलेली नाही. त्यांचा फोटो पोस्टर वर नसला, त्यांचे महिमा मंडन अथवा प्रतिमा वर्धन केले नाही तर नेहरू-गांधी निष्ठ नेते आणि विचारवंत, पत्रकार सोडून कोणालाही फारसा फरक पडत नाही.

    त्याचबरोबर आणखी एक वेगळी आणि महत्त्वाची बाब यानिमित्ताने समोर आली आहे, ती नेहरू-गांधी अनिष्ट विचारवंत आणि पत्रकारांच्या प्रतिक्रियेतून…!! मोदी सरकार कडून सावरकरांचे महिमा मंडन अपेक्षितच आहे, अशी प्रतिक्रिया नेहरू-गांधी निष्ठांनी व्यक्त केली आहे. पण अशी प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांनी एक प्रकारे सावरकरांविरुद्ध आत्तापर्यंत पाजळलेली शस्त्रेच जणू मोदींसमोर टाकल्याचे दिसून येत आहे…!!

    ICHR च्या पोस्टर वर नेहरू नसण्याचे आणि त्यावरच्या प्रतिक्रियांचे एवढे सगळे अर्थ प्रतीत होत आहेत. शिवाय ICHR चे हे डिजिटल पोस्टर हे अनेक पोस्टर्स पैकी एक पोस्टर आहे. सरकारची विविध खात्यांची अनेक पोस्टर्स सोशल मीडियावर आज उपलब्ध आहेत. त्यामध्ये पंडित नेहरूंचा फोटो आहे. सावरकरांचा फोटो नाही. परंतु नेहरू-गांधीनिष्ठ नेत्यांनी आणि विचारवंतांनी ही बाब सोयिस्कररित्या दुर्लक्षित केली आहे. आणि फक्त ICHR च्या पोस्टरवर नेहरू नसणे याच विषयाचा डंका पिटला आहे.

    ICHR digital poster didn’t published Pt. Jawaharlal Nehru’s photo

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…