actress Urfi Javed : बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ऊर्फी जावेदने लग्नाविषयीचे आपले विचार मीडियासोबत शेअर केले आहेत. जन्माने मुस्लिम ऊर्फी म्हणते की ती कोणत्याही मुस्लिमाशी लग्न करणार नाही. या निर्णयामागचे कारणही तिने दिले आहे. यानंतर सोशल मीडियावर काही लोक ऊर्फीचे समर्थन करत आहेत, तर काही जण तिला विरोधही करत आहेत. I will never marry a Muslim boy On the statement of actress Urfi Javed, two groups on social media said I am currently reading Bhagavad Gita
प्रतिनिधी
मुंबई : बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ऊर्फी जावेदने लग्नाविषयीचे आपले विचार मीडियासोबत शेअर केले आहेत. जन्माने मुस्लिम ऊर्फी म्हणते की ती कोणत्याही मुस्लिमाशी लग्न करणार नाही. या निर्णयामागचे कारणही तिने दिले आहे. यानंतर सोशल मीडियावर काही लोक ऊर्फीचे समर्थन करत आहेत, तर काही जण तिला विरोधही करत आहेत.
काय म्हणाली ऊर्फी?
ऊर्फीने एका मुलाखतीत सांगितले की, मुस्लिम पुरुषांना नेहमीच त्यांच्या महिलांना नियंत्रणात ठेवायचे असते. यामुळे ती इस्लामला मानत नाही. ती म्हणाली, ‘मला ट्रोल करणारे बहुतेक लोक मुस्लिम आहेत. बहुतेक द्वेषयुक्त टिप्पण्याही त्यांच्याकडूनच आहेत. मी इस्लामची प्रतिमा खराब करत आहे, असे त्यांना वाटते. ते माझा द्वेष करतात मात्र, आपण कोणताही धर्म पाळत नसल्याचे तिने सांगितले. त्यांना याची पर्वा नसते की, ते कोणावर प्रेम करतात किंवा भविष्यात कोणाशी लग्न करतील.
ऊर्फीच्या समर्थनात आणि विरोधातही उतरले नेटकरी
एका यूजरने उर्फीच्या समर्थनार्थ लिहिले, उर्फी बरोबर आहे, तुम्ही कधी इरफान पठाणच्या पत्नीचा चेहरा पाहिला आहे का? दुसर्या युजरने लिहिले की, ही तिची निवड आहे, तिला काय आवडते काय नाही, यावर आपण निर्णय घेऊ नये. एका यूजरने गौहर खानला टॅग करत म्हटले की, ‘गौहरसोबतही असेच घडले.’
“मी सध्या भगवद्गीता वाचतेय”
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ऊर्फीचा असा विश्वास आहे की धर्माची सक्ती केली जाऊ नये आणि प्रत्येकाला कोणता धर्म पाळायचा आहे हे निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. आणि हेच ती घरी शिकलेली आहे. “माझे वडील खूप परंपरावादी होते. मी १७ वर्षांची असताना त्यांनी मला आणि माझ्या भावंडांना आमच्या आईकडे सोडले. माझी आई खूप धार्मिक स्त्री आहे, पण तिने कधीही आपल्या धर्माची सक्ती केली नाही. माझी भावंडे इस्लामचे पालन करतात आणि मी नाही, परंतु त्यांनी कधीही माझ्यावर जबरदस्ती केली नाही. असंच असायला हवं. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांवर तुमच्या धर्माची सक्ती करू शकत नाही. ते हृदयातून आले पाहिजे, अन्यथा तुम्ही किंवा अल्लाह दोघांनाही आनंद होणार नाही,” असेही ती म्हणाली.
ती म्हणाली “मी सध्या भगवद्गीता वाचतेय. मला फक्त त्या धर्माबद्दल [हिंदू धर्म] अधिक जाणून घ्यायचे आहे. मला त्यातल्या तार्किक भागामध्ये जास्त रस आहे. मला अतिरेकाचा तिरस्कार आहे, म्हणून मला फक्त पवित्र ग्रंथाचा चांगला भाग काढायचा आहे.” ऊर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीमध्ये तिच्या अल्प कालावधीनंतर प्रसिद्धी मिळवली. तेव्हापासून विविध विवादांमुळे ती सतत चर्चेत आली आहे.
I will never marry a Muslim boy On the statement of actress Urfi Javed, two groups on social media said I am currently reading Bhagavad Gita
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खान प्रकरणात खंडणीचा पुरावा नाही; अद्याप कोणताही अहवाल सादर नाही, एसआयटी चौकशी बंद करण्याची शक्यता
- बैलगाडा शर्यतीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे ; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे आवाहन
- हिंदुत्वाची बोको हरामशी तुलना केल्याने सलमान खुर्शीद अडचणीत, न्यायालयाचे एफआयआर नोंदवण्याचे आदेश
- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मास्क न वापरण्यावरून व्यक्त केला संताप
- हिवाळी अधिवेशन : शेतकऱ्यांच्या वीज बिलाचे राज्य सरकारला विधान परिषदमध्ये झटके; आक्रमक भाजपकडून सभात्याग