बटाट्याची, कांद्याची, पालकाची, मूगाची भजी तुम्ही खाल्ली असेल. पण आज आम्ही तुम्हाला भेंडीची भजी कशी बनवतात ते सांगणार आहोत. चवीला टेस्टी आणि दिसायला आकर्षक असणारी ही भजी कुरकरीत लागते. वरण भात किंवा आमटी भाताबरोबर ही भजी खाण्याचा वेगळाच आनंद आहे. how to make bhendi pakoda
साहित्य
पाव किलो भेंडी, पाव वाटी बेसन, दोन चमचे आलं लसूण पेस्ट, एक चमचा कॉन फ्लॉवर, चवीनुसार तिखट, मीठ. छोटा चमचा हिंग. तेल.
कृती
भेंडी धुवून आणि पुसून घ्या. उभी चिरा, चार भाग करा. पातेल्यात बेसन घ्या. भजीचे पीठासारखे भिजवून घ्या. त्यात भेंडीचे उभे काप टाका. गरम तेलात खमंग तळा.
how to make bhendi pakoda