सध्याचा कालखंड हा स्पर्धात्मक आहे. अशा वेळी कामाप्रमाणेच करत असलेल्या कामाच्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. यातून तसेच बाजारातील नोकऱ्यांची अशाश्वता, उपलब्ध असलेल्या रोजगारांच्या कमी संधी, बाहेर असलेली जीवघेणी स्पर्धा यामुळे प्रत्येकाच्या जीवनावर काही ना काही परीणाम निश्चित होताना दिसतो.How stress affects the heart
कळत नकळत प्रत्येकाच्या डोक्यावर व मनावर अतिरिक्त ताण आहे. हा ताण जरी वरून कळत नसला तरी त्याचे आत शरीरात काही ना काही परीणाम निश्चित होतात.
जगभर त्यावर सतत संशोधन सुरु असते. एका नव्या संशोधनातदेखील त्यावर प्रकाश पडला आहे. त्यानुसार कामाच्या स्वरूपाचा आणि आरोग्याचा संबंध असतो हे स्पष्ट झाले आहे. हलके किंवा विशेष गुंतागुंत नसलेले काम करताना ताण येत नाही, पण तेच उलट असेल, तर ताण येतो आणि त्याचा परिणाम थेट हृदयावर होतो, असे स्वीडनमधील एका संशोधनात आढळले आहे.
युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी या नियतकालिकात त्याची माहिती देण्यात आली आहे. अतिताणाच्या, क्लिवष्ट किंवा गुंतागुंतीच्या कामातून अर्धांगवायूचा झटकाही येऊ शकतो, असे त्यात म्हटले आहे. बस चालविणे, नर्सिंग करणे किंवा असेम्ब्ली लाइनवरचे काम ही तणावाची कामे मानली जातात. असा स्वरुपाची कामे करणाऱ्यांना तणावाची जाणीव असते, पण स्थितीवर त्यांचा ताबा नसतो.
काही वेळा तर काम करणाऱ्यांना तणावाची जाणीवही होत नाही, असे जॉनकोपिंग विद्यापीठातील संशोधनात आढळून आले. तणावाच्या स्थितीत हृदयातील वरचे दोन कप्पे अनैसर्गिक धडधडतात आणि त्यामुळे खालच्या दोन कप्प्यांतील रक्तप्रवाह विस्कळीत होतो.
त्यातून अर्धांगवायूचा झटका येऊ शकत असल्याचा इशारा लेखात देण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना तणाव येतो त्यांनी तणावाचे नियोजन करण्यासही शिकले पाहिजे. तणाव निवळण्यासाठी काही ना काही बाबी केल्याच पाहिजे. त्यातही योगसाधना, व्यायम केल्यास तणाव दूर होण्यास मदत होते. शिवाय ह्रदयाचे कामही सुधारते.