एमएसपी आणि कृषि कायद्यात बदल करणे, या शेतकऱ्यांच्या मागण्या असू शकतात. पण, दिल्ली दंगलीमधील आरोपींच्या सुटकेची मागणी शेतकऱ्यांची कशी असू शकते, असा सवाल केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एमएसपी आणि कृषि कायद्यात बदल करणे, या शेतकऱ्यांच्या मागण्या असू शकतात. पण, दिल्ली दंगलीमधील आरोपींच्या सुटकेची मागणी शेतकऱ्यांची कशी असू शकते, असा सवाल केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केला आहे. How can farmers demand release of riot accused? Narendra Singh Tomar
टिकरी बॉर्डरवर आंदोलनादरम्यान गुरुवारी दिल्ली दंगलींचे आरोपी शरजील इमाम, उमर खालिद यांचे पोस्टर दाखवुन त्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती.
How can farmers demand release of riot accused? Narendra Singh Tomar
तोमर म्हणाले की, दिल्ली दंगलींच्या आरोपीच्या सुटकेची मागणी शेतकरी कशी करू शकतात? मी शेतकरी नेत्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही अशा लोकांपासून दूर रहा. संपावर असलेल्या शेतकऱ्यांच्या हातात पोस्टर होते. त्यात दिल्ली दंगलीमधील आरोपी शरजील इमाम, उमर खालिदसह इतर आरोपींचे आणि पुण्यातील भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना सोडण्याची मागणी करण्यात आली होती.