विशेष प्रतिनिधी
ठाणे – नौपाडा येथील मल्हार सिनेमाजवळील पार्वती निवास येथील दुमजली इमारतीला दोन दिवसांपूर्वी (२० डिसेंबर) आग लागली होती. या आगीत बेघर झालेल्या दोन कुटुंबाना महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापालिकेच्या रेंटल स्कीममधील घरांच्या चाव्या देण्यात आल्या. homeless families gets Homes in two days
महापौरांच्या पाठपुराव्यामुळे या बेघर कुटुंबाना अवघ्या दोन दिवसात घरे मिळाल्याने टकले कुटुंबियांना दिलासा मिळाला. त्यांनी महापौरांची भेट घेवून आभार व्यक्त केले. नौपाडा येथील पार्वती निवास या इमारतीला रविवारी आग लागली, या आगीत या इमारतीतील कुंदन रघुनाथ टकले व रविंद्र रमेश टकले या रहिवाशांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली.
ही बातमी समजताच नौपाडा येथील शिवसेनेचे उपविभागप्रमुख किरण नाक्ती यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला.महापौरांनीही तातडीने या कुटुंबाशी फोनवरुन चर्चा करुन आम्ही पाठीशी आहोत, काळजी करु नका असा शब्द दिल्याने टकले कुटुंबियांना धीर मिळाला.
महापौर नरेश म्हस्के यांनी देखील महापालिकेच्या रेंटल हौसिंग स्कीममधील घरे या टकले कुटुंबियांना भाडेतत्वावर देण्याबाबत संबंधित विभागाला आदेश दिले. त्यानुसार आज पार्वती इमारतीतील टकले कुटुंबियांना महापौर दालनात महापौर नरेश म्हस्के यांनी या दोन्ही कुटुंबियांना चाव्याचे वाटप केले. या कुटुंबियांनी महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिका प्रशासन व किरण नाक्ती यांचे आभार व्यक्त केले आहे.
– बेघर कुटुंबाना अवघ्या दोन दिवसांत घरे
– ठाणे महापौरांमुळे मोठा दिलासा
– नौपाडा येथील आगीमुळे कुटुंबे उघड्यावर
-रेंटल हौसिंग स्कीममधील घरे भाडेतत्वावर दिली
– दोन्ही टकले कुटुंबियांना चाव्याचे वाटप