• Download App
    इतर देशांचा इतिहास गोवा विद्यापीठात शिकवला जातो, मात्र गोव्याचा इतिहास शिकवला जात नाही ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली खंतHistory of other countries is taught in Goa University, but history of Goa is not taught; Chief Minister Dr. Expressed grief by Pramod Sawant

    इतर देशांचा इतिहास गोवा विद्यापीठात शिकवला जातो, मात्र गोव्याचा इतिहास शिकवला जात नाही ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली खंत

    शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा गोव्याशी कसा संबंध होता हे पाहिलं तर फोंडा, डिचोली, सत्तरी आदी अनेक तालुके शिवरायांच्या अधिपत्त्याखाली आले होते.History of other countries is taught in Goa University, but history of Goa is not taught; Chief Minister Dr. Expressed grief by Pramod Sawant


    विशेष प्रतिनिधी

    पणजी : गोवा व छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांचा मोठा संबंध एकेकाळी गोव्याशी आला होता. गोव्यात त्याविषयीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत.शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा गोव्याशी कसा संबंध होता हे पाहिलं तर फोंडा, डिचोली, सत्तरी आदी अनेक तालुके शिवरायांच्या अधिपत्त्याखाली आले होते.

    शिवरायांना पोर्तुगीजांशी तह करावा लागला, अन्यथा शिवाजी महाराजांनी पूर्ण गोवा ताब्यात घेतला असता.पोर्तुगीजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले पण गोव्याच्या संस्कृतीचे जतन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केले.

    मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते गोवा विद्यापीठाच्या मनोहर पर्रीकर स्कूल ऑफ लॉ, गव्हर्नन्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी विद्यालयात छत्रपत्री शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी उच्च शिक्षण खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, कुलगुरू हरिलाल मेनन, कुलसचिव व्ही. एस. नाडकर्णी, मनोहर पर्रीकर स्कूलच्या अधिष्ठाता शैला डिसोझा आदी उपस्थित होते.



     

    यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की , खर तर पोर्तुगीजांच्या आक्रमणापासून गोव्याच्या संस्कृती रक्षणाचे व जोपासण्याचे काम खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे. इतर देशांचा इतिहास गोवा विद्यापीठात शिकवला जातो, पण गोव्याचा इतिहास शिकवला जात नाही, अशी खंत प्रमोद सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.

    पुढे सावंत म्हणले की छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास जाणून घेणे आजच्या युगात महत्त्वाचे आहे.वाचन कमी झाल्याने त्यांचा इतिहास समजून घेतला जात नाही.खर पाहिलं तर शिवाजी महाराजांनी राबविलेले शासन आणि सार्वजनिक धोरणाची आजच्या काळात गरज आहे. सोळाव्या शतकात त्यांनी राबविलेली राजव्यवस्थेचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. , असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.

    History of other countries is taught in Goa University, but history of Goa is not taught; Chief Minister Dr. Expressed grief by Pramod Sawant

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त