वृत्तसंस्था
टोकियो : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. अभिनव बिंद्रानंतर भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत नीरजने कमाल गेली आणि भारतासाठी आजचा शनिवार सुपर डुपर हिट ठरला. नीरज ने पहिल्या थ्रोमध्ये ८७.५६ मार्क
कोणालाच ओलांडता आला नाही. History has been scripted at Tokyo! What Neeraj Chopra has achieved today
नीरज याच्या विजयामुळे भारताने ऑलिंपिक मधले दुसरे सुवर्णपदक पटकावले आहे. याआधी अभिनव बिंद्रा याने 2012 ऑलिंपिकमध्ये शूटिंगमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
नीरज चोप्राच्या विजयानंतर देशभरात आनंदाची लाट उसळली असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. सोनीपत या त्याच्या मूळ गावी त्याच्या घराभोवती प्रचंड मंडप उभारून ग्रामस्थांनी नीरजची कामगिरी पाहिली आणि त्यांना आता आनंदाचे भरते आले आहे. 23 वर्षाचा नीरज चोप्रा भारताचा दुसराच सुवर्णपदक विजेता ठरला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्य मंत्र्यांनी नीरज चे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी ताबडतोब फोन वरून त्यांच्याशी बातचीत करून त्यांचे अभिनंदन केले.