विशेष प्रतिनिधी
सातारा : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन २०२१’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ६ वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेची सुरुवात केली. या स्पर्धेत पंधराशे स्पर्धकांनी भाग घेतला. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या स्पर्धकांना यामध्ये प्रवेश देण्यात आला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. Hill Half Marathon Excitement in Satara
दरवर्षी या स्पर्धेत विदेशी खेळाडूंचा सहभाग असतो. दक्षिण आफ्रिका,इथोपिया या देशाचे स्पर्धक प्रथम क्रमांक पटकावत होते. मात्र आफ्रिकेत आढळलेल्या ओमीक्रोनमुळे यंदा विदेशी धावपट्टूना यंदा बंदी घालण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
-हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्यात उत्साहात
– देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम
– खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उदघाटन
– पहाटे ६ वाजता स्पर्धेला सुरुवात
– शेकडो जणांचा स्पर्धेत भाग
– ओमिक्रोनमुळे आफ्रिकेच्या धावपटूंना बंदी