• Download App
    HIJAB CONTROVERSY: कोणी बिकिनी घालून शाळेत जातं का...?मुद्दा फक्त गणवेशाचा ; भारताला इराण बनवायचे आहे का ? प्रियंका वाड्रांच्या वक्तव्यावर रिचा अनिरुद्धचा पलटवारHIJAB CONTROVERSY: Does anyone go to school wearing bikini ...? Does India want to make Iran? Richa Aniruddha's response to Priyanka Vadra's statement

    HIJAB CONTROVERSY: कोणी बिकिनी घालून शाळेत जातं का…?मुद्दा फक्त गणवेशाचा ; भारताला इराण बनवायचे आहे का ? प्रियंका वाड्रांच्या वक्तव्यावर रिचा अनिरुद्धचा पलटवार

     

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला तो देशभर पसरला प्रामुख्याने शाळा आणि कॉलेजमध्ये कशा प्रकारचा पोषाख असावा असा वाद आहे.यावर प्रियंका गांधी म्हणतात की मुलींनी बिकिनी घाला किंवा हिजाब हे त्यांचे स्वातंत्र्य आहे.आता शाळेत कुणी बिकिनी परिधान केली तर कसं चालेल?आणि हे कसलं स्वातंत्र्य?हा तर स्वेराचार झाला .यावरून प्रकरण चांगलाच तापलं आहे .या वादात आता पत्रकार रीचा अनिरुद्ध यांनी देखील प्रियांका गांधींना काही सडेतोड प्रश्न विचारले आहेत .HIJAB CONTROVERSY: Does anyone go to school wearing bikini …? Does India want to make Iran? Richa Aniruddha’s response to Priyanka Vadra’s statement

     

    उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी प्रियंका गांधी यांनी ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या हॅशटॅगसह महिलांना त्यांचा पोशाख ठरवण्याचा अधिकार घटनेत मिळाला आहे, असे लिहिले आहे. प्रियंका गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संविधानाने महिलांना त्यांचा पेहराव ठरवण्याचा अधिकार दिला आहे. ती तिला पाहिजे ते घालू शकते. मग ती बिकिनी असो वा बुरखा, जीन्स असो किंवा हिजाब..

     

     

    हिजाबच्या वादात टीव्ही पत्रकार ऋचा अनिरुद्ध यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांच्या बिकिनी घालून शाळेत गेल्याच्या विधानावर जोरदार प्रहार केला आहे. रिचा अनिरुद्धने प्रियांकाला त्यांच्या ट्विटवर विचारले आहे की, कोणी बिकिनी घालून शाळेत जाते का? यासोबतच रिचा अनिरुद्ध यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विधानाचीही आठवण करून दिली.

    कर्नाटकातील विद्यार्थिनींनी हिजाब परिधान केल्याच्या वादावर, महिला काय घालणार हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी बुधवारी सांगितले. प्रियंका यांनी ट्विट केले की, “स्त्रीला बिकिनी, हिजाब, बुरखा, साडी किंवा जीन्स घालण्याचा अधिकार आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही आणि नसावे.

    ऋचा अनिरुद्धने प्रियांकाच्या ट्विटला उत्तर देताना विचारले की, एक मुलगी जी बिकिनी, बुरखा किंवा जीन्स घालून शाळेत जाते! कृपया तथ्ये सांगा. मुद्दा शालेय गणवेशाचा आहे बाकी काही नाही! भारतीय महिलांच्या पिढ्यांनी प्रतिगामी पर्दा व्यवस्थेपासून मुक्त होण्यासाठी संघर्ष केला आहे. तुम्हाला ते परत हवे आहे आणि भारताला इराण बनवायचे आहे?

    याशिवाय ऋचा अनिरुद्ध यांनी प्रियांका गांधी यांना काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. ऋचा अनिरुद्धने अशोक गेहलोत यांच्या त्या ट्विटचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. ज्यावर स्त्रीला बुरख्यात कैद करण्याचा समाजाला अधिकार नाही, असे लिहिले आहे.

    स्त्रीला बुरख्यात कैद करता येत नाही. स्त्रीला दुर्गा म्हटल्यावर तिनेही देशाच्या जडणघडणीत सहभागी व्हायला हवे… आता काळ बदलला आहे, महिलांना धैर्याने आणि हिंमतीने पुढे जावे लागेल, शासन सदैव तुमच्या पाठीशी उभे राहील.

     

    HIJAB CONTROVERSY: Does anyone go to school wearing bikini …? Does India want to make Iran? Richa Aniruddha’s response to Priyanka Vadra’s statement

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!