विशेष प्रतिनिधी
लंडन – गेल्या ३० वर्षांत जगातील कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे, असे ‘लॅन्सेट’ या नियतकालिकातील आकडेवारीवरून उघड झाले आहे. High BP patients increasing all over the world
आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने गेल्या ३० वर्षांतील १८४ देशांतील ३० ते ७९ या वयोगटातील दहा कोटी व्यक्तींच्या रक्तदाबाचे नमुने तपासले. यावेळी, रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले.
पॅराग्वे, तुवालू या देशांत निम्म्याहून अधिक महिला उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. अर्जेंटिना, पॅराग्वे, ताजिकिस्तान आदी देशांत निम्म्याहून अधिक पुरुषांचा उच्च रक्तदाब आहे. कॅनडा व पेरू या देशांत उच्च रक्तदाबाचे रुग्ण सर्वांत कमी आहेत. त्याचप्रमाणे, तैवान, दक्षिण कोरिया, जपान, ब्रिटन व इतर काही युरोपीय देशांत महिला रुग्णांची संख्या सर्वांत कमी आहे. बांगलादेश, इथिओपिया आदी देशांत उच्च रक्तदाबाचे पुरुष रुग्ण सर्वांत कमी संख्येने आढळतात.
विकसित देशांत उच्च रक्तदाबाचे रुग्ण कमी झाले असले तरी कमी व मध्यम उत्पनाच्या देशात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे, विकसित देशांप्रमाणेच इतर देशांतील उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनाही निदान व उपचाराची पुरेशी सुविधा उपलब्ध व्हायला हवी.
महत्त्वाच्या बातम्या
- संपादक, लेखक आनंद अंतरकर यांचे निधन
- पुणे महापालिकेचा तुघलकी आदेश, कोरोना नियमभंग करणाऱ्यांकडून दिवसाला दहा लाख रुपये वसूल करा
- मुख्यमंत्री खट्टर यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधी म्हणाले – फिर खून बहाया किसान का
- स्मार्ट पार्किंगला मुंबईत सुरुवात आधुनिक सुविधेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद