वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील नवीन कोरोनाग्रस्तांचा आकडा लाखावर आला आहे. दुसरी लाट कमी होऊ लागली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता कोरोना उपचारांसाठी नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. आहे.Health Ministry Guidelines Revised on corona treatment; no use of ivermectin, zinc or vitamin
कोरोना उपचारासाठी यापूर्वी दिली जाणारी औषधे हटविली आहेत. विशेष म्हणजे वाफ न घेणे, व्हिटॅमिनची गोळी न खाणे आदी गोष्टी यामध्ये आहेत.
दरम्यान, ऑक्सिजन आणि स्टेरॉईंडचा योग्य वापर केला जावा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांसाठी दिलासा देणारी प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉलमधून हटविली होती. याता पुन्हा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासंबंधी नवीन गाईडलाईन जारी केली आहे.
नव्या गाईडलाईननुसार हे करायचे नाही…
- वाफ घ्यायची नाही
- कोणतेही अँटीबायोटीक घ्यायचे नाही
- कोणतीही व्हिटॅमिनची गोळी किंवा झिंकची गोळी घ्यायची नाही
- आयव्हरमेक्टीनचा वापर करायचा नाही
- Doxycycline, hydroxychloroquine चा वापर करायचा नाही.
- ताप आल्यावरच फक्त पॅरॅसिटॅमोल गोळी घ्यायची आहे. अन्यथा नाही
Health Ministry Guidelines Revised on corona treatment; no use of ivermectin, zinc or vitamin