समजा तुम्ही दहा ते बारा हजार फूट उंच पर्वताराजीवर भर्फातून चालत आहात णि अचानक तुमच्या पायाचे ठसे चक्क लाल किंवा गुलाबी उमटू लागले तर तुम्ही अक्षरशः हादरुनच जाल. वरुन पाढरा शुभ्र दिसणाऱ्या बर्फातून तुमचा पाय निघाला की खालील ठसे चक्क लालभडक दिसले तर तुम्हाला काही कळेनासेच होईल. एक तर तुम्ही घाबरुन जाल किंवा हसायला तरी लागाल.Have you ever seen watermelon red snow
मात्र याची प्रचिती तुम्हाला अमेरिकेतील कॅलिफोर्ऩिया प्रातातील सिइरा नेवदा या भागातील पर्वतरांगात उन्हाळ्याचा काळात नेहमी अनुभवायला मिळते. येथील हिमाच्छादीत पर्वतरांगा नेहमीसाऱख्याच शुभ्र दिसतात. मात्र जवळून पहायला गेल्या तर कधी कधी हा बर्फ चक्क लालसर झालेला असतो. एखाद्या कलिंगड्यासारखा रंग त्याला प्राप्त होतो. कधी कधी तसा वासदेखील येतो. त्यामुळे त्याचे नावदेखील वाटरमेलान स्नो असे ठेवण्यात आले आहे. कलिंगड्याला इंग्रजीत वाटरमेलॅन असे म्हणतात.
येथील तापमाऩ चांगलेच थंड असते त्यामुळे हिवाळ्यात येथे हिमवृष्टी होते. मात्र जगात सर्वत्र पांढराशुभ्र दिसणारा बर्फ येथे मात्र कधी कधी लालसर दिसतो. त्यामुळे गिर्यारोहदेखील बुचकाऴ्यात पडतात. पर्यावरण अभ्यासक व शास्त्रत्रांनाही याचे कोडे अमेक वर्षापासून पडले होते. महान तत्ववेतात अरिस्टाटलदेखील या बर्फाच्या चांगलाच प्रेमात पडला होता. त्यांनी यावर लेखनदेखील केले आहे. पुढे पुढे जसजसे विज्ञान प्रगत होत चालले तसा यामागच्या शास्6य कारणाचा वेध घेण्याचे काम सुरु झाले. सुरुवातील याची नेमके कारण कळेनासे झाले.
काही जण म्हणत की येथे असलेल्या खडकांचा किंवा जमिनीखाली असलेल्या खनिजांमुळे बर्फाला असा प्रकारचा रंग येत असेल. मात्र नक्की कारण कोणालाच सांगता येत नसे. त्यामुळे यामागची उत्कंठा वाढू लागली. इतकी की 1818 मध्ये प्रसिद्ध दर्यावर्दी कॅप्टन रॅस आर्टिक खंडाच्या अभ्यासासाठी चार जहाजांसह निघाला होता. वाटेत त्याला हा अचंबित करणारा बर्फ दिसला. त्याने तो बर्फ अभ्यासासाठी इंग्लंडला नेला मात्र तोपर्यंत त्याचे पाण्यात रुपांतर झाले होते. आणि एखाद्या रेड वाईनप्रमाणे तो द्रव दिसत होता. मात्र त्यानंत 19 व्या शतकात यामागचे नेमके कारण कळले व सर्वाचा जीव भांड्यात पडला.
बर्फाला हा रंग तेथेली अल्गीमुळे येत असल्याचे स्पष्ट झाले. या स्नो अल्गी खऱ्या तर हिरव्या रंगाच्या असतात. मात्र त्यामध्ये लाल रंगाच्या पेशी किंवा पिगमेंट असतात. यामुळे त्या अल्गीचे सूर्यापासून संरक्षण होते. ज्यावेळी हिवाळा असतो त्यावेळी या अल्गी गोठून जातात. मात्र उन्हाळ्यात या अल्गीवर सूर्यप्रकाश पडला त्यातील रेड पिगमेंट सूर्याची उष्णता शोषूऩ घेतात. आझीबाजूव बर्फ वितळल्याने या लाल पिगमेट पृष्ठभागावर येतात आणि बर्फ तसाच म्हणजे लालसर गुलाबी दिसू लागतो. हा बर्फाचा थर साधारणपणे 25 सेटींमीटर खालीपर्यंत राहतो. त्यामुळे येथे काही भागात कलिंगड्यासारख्या बर्फ दिसतो अशा निष्कर्ष शास्त्रत्रांनी पुराव्यांनिशी सादर केल्यानंतर यामागचे रहस्य उलगडले.