- मच्छिमारांच्या छोट्या गावात जन्माला आलेली मुलगी (Jeni Jerome) लहानपणचं स्वप्न पूर्ण करत केरळची पहिली महिला कमर्शिअल पायलट बनली आहे. Hausalonki Udan !Woman pilot Jeni Jerome from coastal hamlet in Thiruvananthapuram sets out on maiden flight
- मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी फेसबुकवर लिहिले की, छोट्याशा गावातून बाहेर पडलेल्या जेनी जेरोमने आयुष्यात खूप संघर्ष केला. भयानक परिस्थितीशी लढत तिचे बालपणातील स्वप्न साकार करुन जेनी इतर सर्व महिला आणि सामान्य लोकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.
विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपुरम : दिल है छोटासा म्हणतं आसमानोंमे उडनेकी आशा पुर्ण करणारी जेनी जेरोम !लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं तर, कोणालाही आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटेल. पण, आकाशात उडण्याचं स्वप्न पूर्ण होत असेल तर, त्या आनंदाला सीमाच उरत नाहीत. काहीशी अशीच परिस्थिती झाली २३ वर्षांच्या जेनी जेरोमची. जेव्हा तीला कळालं की Air Arabia G9 449 साठी शारजा ते तिरुअनंतपुरम उड्डाणासाठी को-पायलट म्हणून तीची निवड झाली आहे.Hausalonki Udan !Woman pilot Jeni Jerome from coastal hamlet in Thiruvananthapuram sets out on maiden flight
तिरुअनंतपुरममधील किनारपट्टीवर वसलेल्या अनेक खेड्यांपैकी एक असलेल्या कोचुथुरा येथील मूळची रहिवासी असलेली जेनी सध्या आई-वडिलांसोबत अजमान येथे राहतात.लहानपाणापासूनच तीला उडण्याची आवड होती.
केरळ राज्यात जेनीने इतिहास रचला आहे. राज्यातली पहिली व्यावसायिक महिला पायलट बनलेल्या जेनीची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. कॉंग्रेसचे नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनीजेनीला पहिल्या व्यावसायिक विमान उड्डाणासाठी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या.
“कोचुथुराकडून सह-पायलट म्हणून पहिल्यांदा विमान उड्डाण करणाऱ्या जेनी जेरोम याचं अभिनंदन. आज त्या @aiararabiagroup फ्लाइट SHJ ते TRV उडवणार आहे, एका लहानशा मच्छिमारांच्या खेड्यातून आलेल्या एक मुलीचं व्यावसायिक पायलट होण्याचं बालपणीचं स्वप्न आज साकार झालं. त्यांची कहाणी खरंच प्रेरणादायी आहे!” अशा शब्दात थरूर यांनी जेनी यांचं कोतुक केलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी व्यावसायिक पायलट म्हणून संयुक्त अरब अमिरातीच्या त्रिवेंद्रम ते शारजाहपर्यंत प्रवास करणार्या जेनी जिरोमचे कौतुक केले.
मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, कोच्चुथुरा, तिरुअनंतपुरममधील जेनी जेरोमच्या कर्तृत्वाचा राज्याला अभिमान आहे. जेनीचे जीवन स्त्रिया आणि सर्वसामान्यांसाठी एक उत्कृष्ट प्रेरणा आहे.अशा घटना सामाजिक जागरूकता देखील निर्माण करतात. जेनीच्या इच्छेस समर्थन देणारे कुटुंब हे देखील समाजासाठी एक आदर्श आहे. मुलींसाठी आधार देण्याचे हे मॉडेल अवलंबण्यासाठी संपूर्ण समुदाय तयार झालाच पाहिजे.
Hausalonki Udan !Woman pilot Jeni Jerome from coastal hamlet in Thiruvananthapuram sets out on maiden flight