• Download App
    हरियाणा बनली खेळांची पंढरी ; ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी ५० टक्के पदके पटकावली; इतर राज्यांनी आदर्श घ्यावा Haryana became the abode of sports; Won 50 per cent medals for India in the Olympics; Other states should follow suit

    हरियाणा बनली खेळांची पंढरी ; ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी ५० टक्के पदके पटकावली; इतर राज्यांनी आदर्श घ्यावा

    वृत्तसंस्था

    चंदिगढ : हरियाणा ही खेळांची पांढरी बनली असून नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी तब्बल ५० टक्के पदके पटकावली आहेत. त्यामुळे हरियाणाचा आदर्श समोर ठेऊन अन्य राज्यांनी खेळाबाबत नियोजन करण्याची गरज आहे. Haryana became the abode of sports; Won 50 per cent medals for India in the Olympics; Other states should follow suit

    हरियाणामध्ये सरकार खेळांसाठी आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देत आहे. कुस्ती, बॉक्सिंग, हॉकी, कब्बडी यांच्यानंतर शूटिंग, टेनिस, एथलेटिक्सचे खेळाडू तयार केले जात आहेत. ४४० खेळ उद्याने, २३२ मिनी स्टेडियम, २१ जिल्हा और २ प्रदेश स्तरीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारली आहेत.
    खेळांसाठी विविध स्टेडियम असून ३५० कोच खेळाडूंना प्रशिक्षण देतात. २२ खेळांना येथे आधार मिळाला आहे. त्यामुळे हरियाणाचे खेळाडू स्पर्धांमध्ये चमकत आहेत.



    टोकियो ऑलिंपिकमध्ये हरियाणाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करुन हे दाखवून दिले की हरियाणात खेळाना मोठे प्रोत्साहन दिले जात आहे.सगळ्या राज्य सरकारांनी हरियाणाचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे.

    हरियाणात कुस्ती, बॉक्सिंग, हॉकी, कब्बडी यांच्यानंतर शूटिंग, टेनिस, एथलेटिक्सचे खेळाडू तयार केले जात आहेत. राज्याची लोकसंख्या २ टक्के आहे. परंतु ऑलिम्पिक स्पर्धेत हरियाणातील ३१ खेळाडूंनी भाग घेतला होता. देशाच्या तुलनेत ही संख्या २५ टक्के आहे. त्यामध्ये तीन खेळाडूंनी वैयक्तिक पदके प्राप्त केली. त्यात सुवर्ण, रौप्य आणि कास्यपदकांचा समावेश होता.

    हॉकीत भारताला कांस्यपदक मिळाले. ऑलिम्पिकसाठी गेलेल्या हॉकी संघात ५० टक्के खेळाडू हरियाणाचे होते. टोकियो ऑलिम्पिक संपल्यानंतर आता फ्रांन्स येथे २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी हरियाणातील खेळाडूंनी सुरु केली आहे.

    हरियाणात खेळात आघाडीवर का ?

    •  सरकारचे खेळांसाठी आर्थिक मदत आणि प्रोत्साहन
    •  कुस्ती, बॉक्सिंग, हॉकी, कब्बडी यांच्यानंतर शूटिंग, टेनिस, एथलेटिक्सचे खेळाडू तयार केले जात आहेत.
    •  ४४० खेळ उद्याने, २३२ मिनी स्टेडियम, २१ जिल्हा और २ प्रदेश स्तरीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारली
    • फ्रांन्स येथे २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी हरियाणातील खेळाडूंनी सुरु केली आहे.

    Haryana became the abode of sports; Won 50 per cent medals for India in the Olympics; Other states should follow suit

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…