• Download App
    Happy birthday Smriti Irani: वो शक्ती है, सशक्त है वो भारत की नारी है..! राहुल गांधींचा गड जिंकणाऱ्या स्मृती इराणी यांना खास शुभेच्छा ; ‘ तुलसी ते अमेठी ‘@46.Happy birthday Smriti Irani: she is strong, she is the woman of India ..! Special congratulations to Smriti Irani who won Rahul Gandhi's fort; ‘Tulsi to Amethi’ @ 46

    Happy birthday Smriti Irani: वो शक्ती है, सशक्त है वो भारत की नारी है..! राहुल गांधींचा गड जिंकणाऱ्या स्मृती इराणी यांना खास शुभेच्छा ; ‘ तुलसी ते अमेठी ‘@46

    • 2019 मध्ये अमेठी येथून राहुल गांधींच्या विरोधात झालेल्या निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली. स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसचा गड उद्ध्वस्त करून राहुल गांधींना आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत केले होते.

    • मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात स्मृती इराणी यांना वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. मे 2019 मध्ये महिला व बाल विकास मंत्री म्हणून त्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

    • राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील बडे दिग्गज त्यांचे सोशल मीडियावर अभिनंदन करत आहेत. मोदी सरकारमध्ये केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या  कारकिर्दीला टीव्ही जगतापासून सुरुवात केली ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून घराघरात आपली छाप पाडणाऱ्या स्मृती इराणी यांनी 2003 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांचा जन्म 1976 मध्ये देशाची राजधानी दिल्लीत झाला.Happy birthday Smriti Irani: she is strong, she is the woman of India ..! Special congratulations to Smriti Irani who won Rahul Gandhi’s fort; ‘Tulsi to Amethi’ @ 46

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: मोदी सरकारमध्ये वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणार्या स्मृती इराणी आज आपला 46 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. क्योंकी सास भी कभी बहू थी! मधून घराघरात पोहचलेल्या तुलसीने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तसचं त्यांनी राजकारणात देखील धडाकेबाज परफॉरमंस दिला आणि अमेठीतील घरानेशाही वर थेट वार करत राहुल गांधींचा पराभव केला.Happy birthday Smriti Irani: she is strong, she is the woman of India ..! Special congratulations to Smriti Irani who won Rahul Gandhi’s fort; ‘Tulsi to Amethi’ @ 46

    त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा,भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी त्यांना अभिनंदनपर संदेश पाठवले आहेत. स्मृती इराणी यांच्या कार्याचे कौतुक करत पंतप्रधान मोदींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    पीएम मोदी यांनी ट्विट केले आहे की, “केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.  महिला सक्षमीकरणासाठी सरकारच्या प्रयत्नांना तत्परतेने पुढे नेत आहेत. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो.

    विजया रहाटकर यांनी देखील छानसे ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
    वो शक्ती है, सशक्त है
    वो भारत की नारी है
    प्रभु श्रीराम आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.

    क्योंकी सास भी कभी बहू थी’ मुळे घराघरात पोहोचली

    स्मृती इराणी यांनी होली चाइल्ड ऑक्झिलियम स्कूलमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लर्निंगमध्ये प्रवेश घेतला. वडिलांना मदत करण्यासाठी आणि काही पैसे कमवण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणूनही काम केले. यादरम्यान कोणीतरी त्यांना मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी दिल्लीहून मायानगरी मुंबई गाठली. 1998 मध्ये त्यांनी मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्वतःचे स्थान निर्माण केले. त्याच वर्षी मिका सिंगच्या ‘सावन में लग गई आग’ या अल्बममधील ‘बोलियान’ गाण्यात त्यांनी परफॉर्म केला. एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या शोमुळे त्या देशातील घराघरात पोहोचल्या. यापूर्वी एकता कपूरच्या टीमने त्यांना या भूमिकेसाठी नकार दिला होता. मात्र नंतर स्मृती इराणी यांच्या दमदार अभिनयामुळे ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. स्मृती इराणी यांनी ‘विरुद्ध’, ‘तीन बहुरानी’ आणि ‘एक थी नायिका’ यांसारख्या अनेक मालिकांमध्येही काम केले.

    2010 मध्ये स्मृती भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि महिला विंगच्या अध्यक्षा झाल्या. 2019 मध्ये अमेठी येथून राहुल गांधींच्या विरोधात झालेल्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली. स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसचा गड उद्ध्वस्त करून राहुल गांधींना आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत केले होते.

    Happy birthday Smriti Irani: she is strong, she is the woman of India ..! Special congratulations to Smriti Irani who won Rahul Gandhi’s fort; ‘Tulsi to Amethi’ @ 46

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’