• Download App
    हनुमानांचे जनमस्थान नाशिक जिल्ह्यातील अंजनेरीच Hanuman's birthplace is Anjaneri in Nashik district

    हनुमानांचे जनमस्थान नाशिक जिल्ह्यातील अंजनेरीच

    प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर दंडकारण्यात म्हणजेच नाशिकमध्ये आले. रावणाने सीताहरण केल्यानंतर येथेच त्यांची भेट हनुमानाशी झाली. त्यामुळे अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान, त्याचे अनेक पुरावेही पुराणात आढळतात. मात्र यानंतरही आता तिरूमला तिरूपती देवस्थानने हनुमान जन्मस्थान अंजनाद्री पर्वतावर झाल्याचा दावा केला आहे. मात्र, नाशिकमधील महंत आणि इतिहास अभ्यासकांच्या मते पुराणातील संदर्भ बघितले तर हनुमानाचे जन्मस्थान नाशिकजवळील अंजनेरीच आहे.  Hanuman’s birthplace is Anjaneri in Nashik district


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर दंडकारण्यात म्हणजेच नाशिकमध्ये आले. रावणाने सीताहरण केल्यानंतर येथेच त्यांची भेट हनुमानाशी झाली. त्यामुळे अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान, त्याचे अनेक पुरावेही पुराणात आढळतात. मात्र यानंतरही आता तिरूमला तिरूपती देवस्थानने हनुमान जन्मस्थान अंजनाद्री पर्वतावर झाल्याचा दावा केला आहे. मात्र, नाशिकमधील महंत आणि इतिहास अभ्यासकांच्या मते पुराणातील संदर्भ बघितले तर हनुमानाचे जन्मस्थान नाशिकजवळील अंजनेरीच आहे.

    रामायणातील घडमोडींच्या आधारे अनेक घटना घडामोडींविषयी झारखंड, कर्नाटक, गुजरातने अनेक दावे-प्रतिदावे केले आहेत. आता तिरूमला तिरूपती देवस्थानने परिसरातील अंजनेद्री पर्वतावर हनुमान जन्मस्थान असल्याचा दावा केला आहे. तिरूपती देवस्थानचा दावा कर्नाटक सरकारने फेटाळला आहे आणि कर्नाटकातील कपोल कोप्पल जिल्ह्यात अनेगुंडीजवळ किश्कींधा येथे हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात अद्याप काही दावा केला नसला तरी नाशिकमधील हनुमान भक्त, महंत तसेच इतिहास अभ्यासकांनी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला आहे.



    यातील डॉ. दिनेश वैद्य यांनी सांगितले की, दोन हजार वर्षांपूर्वी हस्तलिखिते नव्हती. हनुमानाचा जन्म पाच ते साडेपाच हजार वर्षांपूवीर्चा आहे. आता पाच-साडेपाच हजार वर्षांपूूर्वीच्या घटनेपूवीर्चा संदर्भ तपासण्यासाठी पुराणांचा संदर्भ घेतला तरी स्कंद पुराणात आणि रामायणातही थेट उल्लेख आहे. रामायणातील घडामोडी नाशिकशी संबंधित आहेत. सीताहरण पंचवटीत झाले आणि त्यानंतरच प्रभू रामचंद्रांची भेट हनुमानजींसोबत झाली. रामायण, स्कंद पुराणात यासंदर्भात उल्लेख आहे.

    अंजनेरी गड हनुमान जन्मस्थानाचे महामंडालेश्वर स्वामी सोमेश्वरानंद यांच्या म्हणण्यानुसार, श्री त्र्यंबकेश्वराचे म्हणजेच भगवान महादेवाचे स्थान आणि त्यांचा अवतार म्हणून हनुमानजींचा त्याच नजीकच झालेला जन्म याचे पुराणात दाखले आहे. त्यामुळे जन्मस्थान अंजनेरी हेच आहे. यासंदर्भात लवकरच सप्रमाण माहिती राज्य सरकारला दिली जाणार आहे.

    पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामायणातील घटना आपल्याच भागात झाली असे अनेक जण म्हणतात, मात्र पुराणाच्या आधारे जन्मस्थान नाशिकजवळील अंजनेरी हेच आहे. बालक हनुमान मातेच्या कुशीत असल्याची मूतीर्ही गडावर प्रतिष्ठापित आहे.

    Hanuman’s birthplace is Anjaneri in Nashik district


    महत्वाच्या बातम्या 

     

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…