• Download App
    फेसबुक वापरताय, सावधान?, तुमच्या माहितीवर हॅकर्सकडून डल्ला मारण्याचा वाढता धोका |Hackers can use data of Face book users

    फेसबुक वापरताय, सावधान?, तुमच्या माहितीवर हॅकर्सकडून डल्ला मारण्याचा वाढता धोका

    विशेष प्रतिनिधी 

    न्यूयॉर्क  : फेसबुक या सोशल मीडिया व्यासपीठावरील ५० कोटींहून अधिक युजरची खासगी माहिती इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे. हॅकरकडून या माहितीची चोरी होण्याची भीती व्यक्त होते आहे.Hackers can use data of Face book users

    सोशल मीडिया कंपन्यांकडून ज्या प्रचंड प्रमाणात माहिती गोळा केली जाते, ती कितपत सुरक्षित राखली जाते, असा सवाल या घटनेनंतर विचारला जात आहे.‘बिझनेस इनसायडर’ या संकेतस्थळाने ही बाब उघडकीस आणली.



    त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटवर १०६ देशांमधील ५० कोटींहून अधिक युजरचे दूरध्वनी क्रमांक, फेसबुक आयडी, पूर्ण नाव, लोकेशन, जन्मतारीख आणि ईमेल ॲड्रेस अशी माहिती उपलब्ध आहे. डाटा सुरक्षेसाठी ‘फेसबुक’ अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे.

    केम्ब्रिज ॲनालिटिका या राजकीय सल्लागार कंपनीने ‘फेसबुक’च्या परवानगीशिवाय ८.७० कोटी युजरची माहिती मिळविली होती. या घटनेनंतर २०१८ मध्ये फेसबुकने मोबाईल क्रमांकावरून युजर शोधण्याची सुविधा बंद केली होती. डिसेंबर २०१९ मध्येही युक्रेनमधील एका कंपनीला फेसबुकच्या २७ कोटी युजरची माहिती फेसबुकवर आढळली होती.

    Hackers can use data of Face book users

    Related posts

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!