विशेष प्रतिनिधी
जालना: स्थानिक गुन्हे शाखेनं २० लाखांचा राजनिवास गुटखा जप्त केला आहे. एका आयशर ट्रकमधून हा गुटखा नेला जात होता. Gutka worth Rs 20 lakh seized in Jalna
तपासणीत ट्रकमध्ये गुटखा आहे हे कळू नये म्हणून अलीकडे ऊशा ठेवल्या होत्या. यवतमाळकडे गुटखा वाहतूक केली जात असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. या माहितीवरून पोलिसांनी देऊळगावराजा रोडवर सापळा रचला होता. ट्रक येताच तपासणी केली.
त्यात अलीकडे ऊशा ठेवलेल्या आढळल्या तर मध्ये गुटख्याच्या गोण्या आढळल्या.पोलिसांनी ट्रक तसेच चालकाला ताब्यात घेतलं असून गुटखा जप्त केला आहे.या जप्त केलेल्या गुटख्याची किंमत २० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.