प्रतिनिधी
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आणि साहित्यावर प्रबंध सादर करून पहिली डॉक्टरेट पदवी मिळवणारे विचारवंत आणि शिक्षणतज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांचे आज निधन झाले. Great savarkariet thinker Dr. P. L. Gavade is no more
ते विमलाबाई गरवारे प्रशालेचे मुख्याध्यापक होते. सावरकरांच्या निधनानंतर दोनच वर्षांनी सन १९६८ मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन कार्य आणि साहित्य या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठाला पहिला संशोधन प्रबंध सादर केला. सावरकर या विषयावर देशातील पहिली डॉक्टरेट मिळवणारे ते विचारवंत अभ्यासक ठरले.
गावडे यांची शैक्षणिक आणि वैचारिक कारकीर्द मोठी आहे. वाईच्या धर्मपुरी घाटावरील आणि पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत त्यांनी दिलेली व्याख्याने गाजली. पुण्याच्या व महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षैत्रात त्यांनी स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. ते काही काळ आळंदी देवस्थानचे अध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले होते. गावडे यांचे पुणे येथे त्यांच्या घरी निधन झाले. बरेच दिवस ते आजारी होते.
Great savarkariet thinker Dr. P. L. Gavade is no more
महत्त्वाच्या बातम्या
- लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिलेली चिमुकल्या वेदीकाचा मृत्यू
- सत्तेवर असताना काँग्रेस होती हेरगिरीतील जेम्स बॉँड, पेगासिस स्पायवेअर प्रकरणा मुख्तार अब्बास नक्वी यांचा पलटवार
- पुरग्रस्त भागासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले पत्र, मोबाईलवर काढलेले फोटोही पंचनामे म्हणून ग्राह्य धरा
- डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने, भारतीय रोखीचा मोहन सोडून करू लागले डिजिटल व्यवहार, जुलै महिन्यात झाला विक्रम