आमच्या वॉशरूममधील स्वच्छता आणि स्वच्छतेची गुणवत्ता याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
स्वच्छताविषयक समस्येवर लक्ष देण्याबरोबरच पाण्याचा वापर कमीतकमी करू शकतील असे अभिनव उपाय ही काळाची परिपूर्ण गरज आहे.
केंद्र सरकारने लोकांना ५ लाख रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. ही रक्कम जिंकण्यासाठी तुम्हाला एका स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं लागेल. केंद्र सरकारकडून ही योजना आखण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला बक्षीस स्वरुपात ही रक्कम दिली जाईल.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली: केंद्र सरकारनं एका स्पर्धेचे आयोजन केलं असून जिंकणाऱ्या व्यक्तिला ५ लाख आणि उपविजेत्याला २.५ लाखांचं बक्षीस दिले जाणार आहे. केंद्र सरकारकडून ही योजना आखण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन ( SBM) आणि संयुक्त राष्ट्र SDG, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड यांच्या समर्थनाने इनव्हेस्ट इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि AGNIi यांच्या सहयोगानं ‘ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज’ सुरू केले आहे आणि त्यात सर्वांना सहभाग घेता येणार आहे.Grand Water Saving Challenge : central government giving Chance to win 5 lakhs
काय आहे ही स्पर्धा?
सार्वजनिक शौचालयात फ्लश सिस्टिममधून प्रचंड प्रमाणात पाणी वाया जाते. पाणी वाचवण्यासाठी कल्पक फ्लश सिस्टिम तयार करायची आहे. स्पर्धेचा मुख्य उद्देश सामाजिक परिणाम, पाणी वाचवणे आणि स्वच्छता हे आहेत. सध्याच्या काळात पाण्याची बचत करणए गरजेचे आहे. पण, त्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व विसरता कामा नये. मुख्य उद्देश ध्यानी ठेऊन कल्पकतेनं फ्लश सिस्टम तयार करायची आहे आणि त्यातून पाणी वाचवण्यासोबतच स्वच्छतेचे महत्त्व राखले गेले पाहिजे.
बक्षीस रक्कम
प्रथम विजेता – ५ लाख
उपविजेता – २.५ लाख
अर्ज कुठे कराल?
https://www.startupindia.gov.in/content/sih/en/ams-application/challenge.html?applicationId=6050cc03e4b03f92cbc8c95e वरील लिंकवर अर्ज करता येईल
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्याची एंट्री स्टार्टअप इंडिया हबवर जमा केली जाते. DPIIT द्वारे नोंदणीकृत स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात. २५ जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.