वृत्तसंस्था
पुणे : नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या सिंहगडाला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. विशेष म्हणजे ८० वर्षाचे असतानाही एखाद्या तरुणाला लाजवेल, अशा चपळाईने त्यांनी चालत हा गड सर केला आहे. Governor walk to Sinhagad at the age of 80 ; Invitated to locals to come to Uttarakhand
सिंहगड परिसरात राहणार्या नागरिकांनी राज्यपाल येणार्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. वेलकम असेही लिहिले होते. एका ठिकाणी काही महिलांनी सिंहगडाच्या दिशेने जाताना राज्यपालांना थांबवलं आणि त्यांना ओवळल.टीळा लावून स्थानिक महिलांनी राज्यपालांचं स्वागत केलं. ८० व्या वर्षी राज्यपाल चालत कसे काय गड चढतात, याचे अनेकांना कुतूहल वाटले.
राज्यपालांनाही नम्रपणे हात जोडून नमस्कार करत, हसत हसतच स्थानिकांकडून करण्यात आलेलं हे स्वागत स्वीकारलं. आमच्या उत्तराखंडमध्येही असेच गड आहेत ,असे राज्यपालांनी स्थानिकांना सांगितलं.तेव्हा राज्यपालांचे आणि गडाचे नाते जुने असल्याचे उघड झाले. तसेच त्यांच्या लीलया गड चढण्याचे गुपितही स्पष्ट झाले.
तुम्ही एकदा या तिकडे, असं सांगत राज्यपालांनाही स्थानिकांना उत्तराखंडमधील गड पाहण्यासाठी येण्याचं अनौपचारिक आमंत्रणही दिलं. स्थानिकांचं स्वागत स्वीकारुन ते किल्ल्याकडे मार्गस्थ झाले.
रविवारी शिवसृष्टीच्या कार्यक्रमानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सोमवारी सिंहगडावर जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर कोश्यारी यांनी क्षणाचाही विलंब न करता. “आप भी आ जाना,” असे उत्तर दिले. त्यानंतर या उत्तरावरुन एकच हशा पिकला. पण, आज त्यांनी सिंहगड सर करून प्रत्यक्ष उत्तर दिले आहे.
शिवनेरीसुद्धा गेल्या वर्षी सर केला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १६ ऑगस्ट २०२० रोजी पायी चालत शिवनेरी किल्ली सर केला होता. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल कोश्यारी यांनी पायी चालत किल्ला सर करण्याची मानस बोलून दाखवला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या ७९ व्या वर्षीही कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी चालत सर केला होता. अशाप्रकारे पायी चालत शिवनेरी किल्ला सर करणारे कोश्यारी हे पहिलेच राज्यपाल ठरले होते.
Governor walk to Sinhagad at the age of 80 ; Invitated to locals to come to Uttarakhand
महत्त्वाच्या बातम्या
- पाच हजार दहशतवाद्यांची काबूलच्या तुरुंगातून सुटका; तालिबानचे अफगाणिस्तावर वर्चस्व
- बिहारमध्ये गंगेचे रौद्र रूप धारण केल्याने हाहाकार, महापुराचा तीन लाख लोकांना फटका
- तालिबानच्या घुसखोरीनंतर अमेरिकन अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरने सुटका, भारतीयांनाही सुखरुप सोडवले
- डेक्कन क्वीनच्या शिरपेचात विस्टाडोममुळे मानाचा आणखी एक तुरा, निसर्गरम्य सौंदर्य अनुभवल्याने प्रवासी सुखावले