मुंबई : पुणे येथील कार्यक्रमात मला माजी मंत्री म्हणू नका, येत्या ३-४ दिवसांत कळेल,असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाटील यांनी केले होते. त्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खास शैलीत चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार असे माझ्या कानावर आल म्हणून ते तसे बोलले असतील,असा टोला संजय राऊतांनी लगावला. Governor of Nagaland Offer to Chandrakant Patil : Sanjy Raut
राऊत म्हणाले, चंद्रकांत दादा हे आमचे मित्रं आहेत. राजकारणात आम्ही टीका करत असतो. ते म्हणाले माजी मंत्री म्हणू नका. चमत्कार होणार आहे. चंद्रकांतदादा अवतारी पुरुष आहेत. चमत्कारी पुरुष आहेत. ते काही तरी चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना समजू शकतो.
स्वप्न पाहण्यासाठी टॅक्स लागत नाही
उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार कायम राहणार आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागेला नाही. जीएसटी लागलेला नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं माझ्या कानावर आलं. त्यामुळे त्यांना माजी म्हणून घ्यायचं नसेल, असं राऊत म्हणाले.
- – नागालँड राज्यपालपदाची चंद्रकात पाटीलना ऑफर
- – खास शैलीत चंद्रकांत पाटलांचा समाचार
- – चंद्रकांत दादा हे आमचे मित्रं आहेत
- – ते काही तरी चमत्कार घडवतील
- – माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना समजू शकतो.