वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिवाळीच्या पूर्वसंध्येला केंद्रातील मोदी सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत जनसामान्यांना दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची घट करून पेट्रोल-डिझेल केंद्र सरकारने स्वस्त केले आहे.Government of India announces excise duty reduction on petrol and diesel. Excise duty on Petrol and Diesel to be reduced by Rs 5 and Rs 10 respectively from tomorrow
गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल रेट शंभरी ओलांडून दरवाढीचे नवे उच्चांक केले होते. त्याचा परिणाम दिवाळीसारख्या सणात महागाईच्या रुपात जनसामान्यांना भोगावा लागला होता. पेट्रोल-डिझेलच्या भावाबरोबरच जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठी वाढ दिसून येत होती. यामध्ये खाद्यतेले, डाळी यांचा समावेश होता. मध्यंतरी खाद्य तेलाच्या किमतीत किंचित घट करण्यात आली होती. परंतु एकूण महागाई मात्र कमी होताना दिसत नव्हती.
आता उद्यापासून उद्याच्या नरकचतुर्दशी पासून उत्पादन शुल्क 5.00 रुपयांनी आणि डिझेलवर चे उत्पादन शुल्क 10.00 रुपयांनी घटविण्याचा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे दिवाळी सणामध्ये जनसामान्यांना महागाईच्या चटक्यापासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Government of India announces excise duty reduction on petrol and diesel. Excise duty on Petrol and Diesel to be reduced by Rs 5 and Rs 10 respectively from tomorrow
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान