- शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला
- मेटे म्हणाले – सरकारी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही.
- आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न कराल तर सर्व मराठा समाज शिवसेनेच्या विरोधात जाईल.
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठक सुरु होती. मात्र, या बैठकीत अचानक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ सुरु केला. काही तरुण अचानक बैठकीत घूसले. त्यांनी जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. ते विनायक मेटे यांच्याजवळ आले आणि बैठक उधळून लावली. पोलिसांच्या मध्यस्थीने संबंधित प्रकार थांबवन्यात आला .विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर टीका केली. त्यामूळे त्यांच्या बैठकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धूडगूस घातला .Government hooliganism! Shiv Sainiks riot at Shiv Sangram meeting in Aurangabad; Criticism of state government over Maratha reservation; Meeting closed
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. संबंधित बैठक ही शिवसंग्रामच्या मेळाव्या संदर्भात सुरु होती. या बैठकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला . बैठकीत घुसून बैठक बंद पाडली.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे मराठा आरक्षण या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यांनी अनेकदा राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी औरंगाबादमध्ये त्यांची बैठक उधळून लावली आहे.
विनायक मेटे काय म्हणाले?
शिवसेनेच्या लोकांनी हा कार्यक्रम उधळून लावत कार्यकर्त्यांला मारहाण केली. आमचे शहराध्यक्ष यांचा मुलगा डॉक्टर अभिमन्यू माकने याला मारहाण करण्यात आली. ही सरकारी गुंडगिरी आहे. सरकारी पक्षाच्या गुंडांनी येऊन गोंधळ घातला. मात्र मराठा समाज मोगलांना आदिलशहा आणि इंग्रजानाही घाबरला नाही. त्यामुळे सरकारच्या गुंडगिरी ही घाबरणारा नाही हे शिवसेनेने लक्षात ठेवावे असा आरोप शिवसंग्रामच्या आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे.