जन्मजात अंध असलेल्या व्यक्तींनाही वस्तू ओळखायला आणि त्यातील चलचित्रांच्या माध्यमातून गोष्ट वाचायला, समजायला शक्य होणार आहे. अंधांना स्पर्शज्ञानाशिवायही एखादी बाब समजावी यासाठी संशोधकांनी व्हिडिओ गॉगल तयार केला आहे.Google’s video for the blind
या व्हिडिओ गॉगलमधील आवाजाच्या माध्यमातून ते वाचायलाही शिकणार आहेत. त्याचबरोबर एखादी नवीन गोष्ट ओळखायलाही शिकणार आहेत. आवाजाच्या माध्यमातून अंध व्यक्ती एखादी गोष्ट समजून घेते. अंधांना एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी या व्हिडिओ गॉगलमध्ये प्रकाशाऐवजी पर्यायी व्यवस्था म्हणून आवाजांचा वापर करण्यात आला आहे.
गॉगलमधील हा आवाज माहितीचा अर्थ लावणाऱ्या मेंदूतील भागाला कार्यरत करतो. मेंदूतील या भागाला व्हिज्युअल कार्टेक्स म्हणतात. याचा उपयोग करणे एकदा थांबले की, त्याचा फेरवापर करणे जवळजवळ अशक्यच असते. प्रौढांचा मेंदू हा आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त लवचिक असतो असे जेरुसलममधील हिब्रू विद्यापीठातील संशोधकांचे म्हणणे आहे.
संशोधकांनी जन्मजात अंध असलेल्या व्यक्तींसाठी जाणिवांना पर्यायी ठरणारे उपकरण तयार केले. या उपकरणाने अंधांकडे डोळय़ांव्यतिरिक्त असलेल्या जाणिवांच्या माध्यमातून गोळा होणारी दृश्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते.
उदा. चित्रफित ते ध्वनिफित अशा असलेल्या उपकरणात चित्रफितीतील दृश्य माहितीचे रूपांतर ध्वनीच्या रूपात केले जाते आणि या ध्वनीच्या माध्यमातून अंध व्यक्ती माहिती समजून घेते. व्हिडिओ गॉगलच्या माध्यमातून अंध व्यक्ती चित्रफितीतून माहिती ऐकते आणि या दृश्य माध्यमातून येणाऱ्या माहितीचा अर्थ ध्वनीच्या, आवाजाच्या स्वरूपात लावते. अशा प्रकारे दृश्य माहिती समजून घेते.
Google’s video for the blind