• Download App
    मुंबईकरांसाठी GOOD NEWS! पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही !पोलीस आयुक्त संजय पांडे यांची घोषणाGOOD NEWS for Mumbaikars! No need to go to police station for passport verification! Announcement by Commissioner of Police Sanjay Pandey

    मुंबईकरांसाठी GOOD NEWS! पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही !पोलीस आयुक्त संजय पांडे यांची घोषणा

    • स्थानिक पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल अर्जदाराच्या घरी येणार.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज एक महत्वाची घोषणा केली आहे. पासपोर्टच्या पडताळणीसाठी यापुढे मुंबईकरांना आता पोलीस स्टेशनमध्ये हजर रहावं लागणार नाहीये. ज्या ठिकाणी कागदपत्र अपूर्ण असतील तिकडे मात्र अर्जदारांना पोलीस स्टेशनमध्ये हजर रहावं लागणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.GOOD NEWS for Mumbaikars! No need to go to police station for passport verification! Announcement by Commissioner of Police Sanjay Pandey

    आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोलीस आयुक्तांनी याची घोषणा केली असून यापुढे पासपोर्टच्या पडताळणीसाठी स्थानिक पोलीस स्टेशनमधून कॉन्स्टेबल अर्जदाराच्या घरी येणार आहे. जर या नियमाचं पालन केलं जात नसेल तर याबद्दल तक्रार करण्याचं आवाहन संजय पांडे यांनी केलं आहे.

    पासपोर्ट व्हेरिफिकेशन ही प्रत्येक अर्जदारासाठी खूप वेळखाऊ प्रक्रीया मानली जाते. अनेकदा या व्हेरिफीकेशनसाठी अर्जदारांना पोलीस स्टेशनमध्ये लाईन लावावी लागते. ज्यातून भ्रष्टाचार आणि लाचखोरीची काही प्रकरणं समोर येतात. याला आळा घालण्यासाठी नवनिर्वाचीत पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय.

    मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यानंतर संजय पांडे यांनी सोशल मीडियावरुन वारंवार मुंबईकरांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. अनेकदा शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, नागरिकांना भेडसावणारे अनेक मुद्दे संजय पांडे यांनी स्वतः लक्ष घालून सोडवले आहेत.

    GOOD NEWS for Mumbaikars! No need to go to police station for passport verification!Announcementby Commissioner of Police Sanjay Pandey

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस