• Download App
    GOOD NEWS : हुर्रे ... लहान मुलांच्या लसीबाबत एक मोठी आणि चांगली बातमी ... GOOD NEWS: a big and good news about children's vaccine ...

    GOOD NEWS : हुर्रे … लहान मुलांच्या लसीबाबत एक मोठी आणि चांगली बातमी …

    • संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन लवकरात लवकर लहान मुलांवरील लस आणण्याचा तज्ज्ञांचा प्रयत्न सुरु आहे.

    • Clinical trial of the Vaccine: लहान मुलांसाठी लसीच्या क्लिनिकल ट्रायलला नागपूरमध्ये सुरुवात झाली असून या क्लिनिकल ट्रायलकडे अवघ्या देशाचं लक्ष .

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर: नागपुरात लहान मुलांच्या लसींच्या क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून  सुरुवात झाली आहे. 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांवर लसींची ट्रायल घेण्यात आली आहे .नागपूर शहरात लहान मुलांवर होणाऱ्या क्लिनीकल ट्रायल बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. यासाठी सुरुवातीला स्टडी सॅम्पल्स देखील घेण्यात आले आहेत.
    GOOD NEWS: a big and good news about children’s vaccine …

    देशात एकूण चार ठिकाणी 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची क्लिनिकल ट्रायल होत आहे. त्यामध्ये एम्स दिल्ली, एम्स पटना, नीलोफर हॉस्पिटल हैदराबाद आणि नागपुरातील मेडिट्रीना हॉस्पिटल यांची क्लिनिकल ट्रायलसाठी निवड करण्यात आली आहे.

    यामध्ये सहा ते बारा वर्षे वयोगटातील 35 मुलांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. लसींच्या ट्रायलपूर्वी या सर्व बालकांची ब्लड टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट देखील करण्यात आली आहे.

    भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सीन लसींच्या क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात बारा ते अठरा वर्षे वयोगटातील 41 मुलांची निवड करण्यात आली होती. समाधानाची बाब म्हणजे या सर्व 41 मुलांमध्ये लस घेतल्यानंतर कुठलेही साईड इफेक्ट दिसून आलेले नसल्यामुळे 28 दिवसानंतर त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

    देशात 4 ठिकाणी 208 दिवस ही ट्रायल होणार आहे. त्यामुळे या ट्रायलमधून काय निष्कर्ष पुढे येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    0 ते 18 वयोगटातील मुलांवर लसीची क्लिनीकल ट्रायल करण्यासाठी परवानगी मेडिट्रीना हॉस्पिटलला मिळाली आहे. एथिकल कमिटीच्या अंतिम होकारानंतर नागपुरात ही ट्रायल सुरु झाली होती.

    लहान मुलांवर लसीची क्लिनीकल ट्रायल घेण्यासाठी 3 टप्पे करण्यात आले आहेत. ज्यात 2 ते 6 वयोगटाचा पहिला टप्पा, 6 ते 12 वयोगटाचा दुसरा टप्पा तर 12 ते 18 वयोगटातील तिसरा टप्पा अशी विभागणी करण्यात आली आहे.

    GOOD NEWS: a big and good news about children’s vaccine …

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार