- मुंबई दिवसरात्र कार्यरत असते. त्याच अनुषंगाने मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटे पाच पर्यंत मुंबईतल्या सहा मार्गांवर बेस्ट बसेस धावणार आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या मुंबईकरांना स्वस्त दरात सार्वजनिक सेवा उपलब्ध व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई: 24 तास बेस्ट सेवा देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाआहे. मुंबई महापालिकेने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसंच रात्रीच्या वेळी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मध्यरात्री बारा ते पहाटे पाच या वेळेत या बेस्टच्या फेऱ्या होणार आहेत. आधी होणाऱ्या पहाटे पाच वाजल्यापासूनच्या फेऱ्यांमध्ये काही बदल होणार नाही.GOOD NEWS
सहा मार्गांवर २४ तास धावणार बस
इलेक्ट्रीक हाऊस, कुलाबा ते महिम बस स्टँड
इलेक्ट्रिक हाऊस ते सायन
माहिम बस स्टँड ते पोईसर डेपो
सायन ते मुलुंड पश्चिम
बॅकबे डेपो ते सायन
माहिम ते बोरीवरली या मार्गावरच्या बस दोन्ही एअरपोर्टमार्गे जातील
निर्णयामुळे टॅक्सीचालकांची मनमानी थांबू शकेल. इच्छित ठिकाणी किंवा आपल्याला हव्या त्या स्टेशनवर जाण्यासाठी मुंबईकरांना आता रात्रीच्या वेळीही बेस्ट सेवा उपलब्ध असणार आहे. बेस्ट प्रशासनाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. ही सेवा आज मध्यरात्रीपासूनच सुरू केली जाणार आहे.