- नवी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी दुपारी 4.30 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला सहा महिन्यांनी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.नवी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी दुपारी 4.30 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे.GOOD BREAKING NEWS: Modi government’s big decision for the poor! PM Garib Kalyan Yojana extended by 6 months
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्रिमंडाळाच्या निर्णयानुसार ही योजना पुढील सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.
गरीब लोकांसाठी सरकारने ही योजना 2016 पासून सुरू केली आहे. कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने 26 मार्च 2020 रोजी ही योजना पुन्हा सुरू केली. या योजनेचा उद्देश एवढाच आहे की देशातील कोणत्याही गरीब व्यक्ती किंवा कुटुंबाला उपासमारीची वेळयेऊ नये आणि या योजनेंतर्गत मोफत धान्य वाटप करून सरकार गरीब लोकांना अन्नाचा पुरवठा करू शकेल.