भारताच्या नीरज चोप्राला सुवर्णपदक
नेमबाज अभिनव बिंद्राने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम .
ऑलिम्पिकच्या वैयक्तिक स्पर्धेत भारताला 13 वर्षानंतर दुसरे सुवर्ण
नवी दिल्ली: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. त्याने भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकले आहे.जर्मनी, झेक रिपब्लीक, पाकिस्तान यांचं कडवं आव्हान मोडून काढत नीरजने 87.58 मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.ऑलिम्पिकच्या वैयक्तिक स्पर्धेत भारताला 13 वर्षांनंतर दुसरे सुवर्ण मिळाले. अनुभवी नेमबाज अभिनव बिंद्राने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला होता .GOLDEN BOY NEERAJ CHOPRA: Golden Moment: Neeraj Chopra, Gold Medal winner after Abhinav Bindra
टोकियो ऑलिम्पिकच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. 23 वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिलं गोल्ड मेडल मिळवलं आहे.
हे भारताचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरले आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदके जिंकली. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. नीरजच्या सुवर्ण व्यतिरिक्त मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक आणि बॉक्सिंगमध्ये लोव्हलिना बोर्गोहेनने कांस्यपदक जिंकले आहे. याशिवाय भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले आणि कुस्तीमध्ये रवी दहिया याने रौप्य पदक पटकावले. दुसरीकडे, बजरंगने शनिवारी कांस्यपदक पटकावले.
GOLDEN BOY NEERAJ CHOPRA: Golden Moment: Neeraj Chopra, Gold Medal winner after Abhinav Bindra