वृत्तसंस्था
गोकाक : पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांचे आकर्षण असणारा बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. पण, लॉकडाऊनमुळे धबधब्याच्या परिसरात शुकशुकाट आहे. Gokak Falls flows at full capacity; Alluring beauty due to torrential rains
बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी, नाले आणि ओढे खळाळून वाहत आहेत. दरवर्षी जुलै महिन्यात पावसाचा जोर असतो आणि गोकाकचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होतो. यंदा मुसळधार पावसामुळे जून महिन्यातच गोकाकचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.
घटप्रभा नदीवरील हा धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील पर्यटकांच्या बरोबरच अन्य राज्यातील पर्यटकही येतात. घटप्रभा नदी १७१ फूट उंचीवरुन खाली कोसळते आणि धबधबा प्रवाहित होतो. धबधब्याची रुंदी ५८१ फूट आहे. घटप्रभा नदीवरचा झुलता पूल पर्यटकांचे खास आकर्षण आहे. धबधबा प्रवाहित झाला असताना त्याचे तुषार काही किलोमीटरपर्यंत उडतात.