वृत्तसंस्था
नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधासाठी केंद्राने आर्थिक भार उचलावा. औषधांवरील जीएसटी संपूर्ण माफ करावा, अशा मागण्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी करून काही तासच उलटतात नाहीत तोच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यांच्या जबाबदाऱ्या ढकलून देऊन केंद्र सरकारवर खापर फोडले आहे. तर जगातील सर्व देशांकडून भारताला मदतीचा ओघ सुरू झाला असताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. GOI’s repeated chest-thumping at receiving foreign aid is pathetic. Had GOI done its job, it wouldn’t have come to this, says rahul gandhi
भारताला परकीय मदत होत असल्यावरून केंद्र सरकारने आपली पाठ थोपटून घेण्याचे कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले काम व्यवस्थित केले असते, तर ही वेळच आली नसती, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. तर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनियांनी लसीकरण कमी वेगात सुरू असण्याचे सर्व खापर केंद्रातील मोदी सरकारवर फोडले. त्याही पलिकडे जाऊन केंद्र सरकारने कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आपली सर्व जबाबदारी राज्यांवर ढकलून दिल्याचा आरोपही केला. देशातील सर्व राज्यांना केंद्र सरकारने मोफत लस पुरविण्याची मागणी त्यांनी केली.
आपापल्या राज्यांमधील लसीकरणापासून सर्व जबाबदारी केंद्रावर ढकलून मोकळे होण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचेच यातून स्पष्ट होते आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या रांगेत आज सोनिया गांधी या देखील जाऊन बसल्या आहेत. या सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात कोरोना नियंत्रित करण्यात अपयश आल्यानंतर त्याची जबाबदारी वेगवेगळ्या मार्गांनी केंद्र सरकारवर ढकलली. त्याचेच प्रतिबिंब सोनिया गांधी यांच्या काँग्रेस कार्यकारिणीतील सुरूवातीच्या भाषणात पडलेले दिसले.
GOI’s repeated chest-thumping at receiving foreign aid is pathetic. Had GOI done its job, it wouldn’t have come to this, says rahul gandhi