मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून नावलौकिक मिळववेल्या प्रदीप शर्मा यांनी २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुक लढवली होती.
GODFATHER: Coincidence … All those arrested in Mansukh Hiren case have links with Shiv Sena; Uddhav Thackeray is the Godfather
विशेष प्रतिनिधी
मुंबई: मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या NIA ने माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आज (गुरुवारी) अटक केली आहे. मनसुख यांच्या हत्येचं प्लानिंग आणि आरोपींना सर्व मदत शर्मांनी पुरवल्याचा NIA ला संशय आहे. प्रदीप शर्मा हे शिवसेनेशी संबंधित असल्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात शिवसेनेचा संबध उघढ झाला आहे .यापूर्वी अटकेत असणारे सचिन वाझे हे देखील शिवसेनेचेच असल्याने सेनेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे .या घटनेमागील खरा गॉडफादर कोण? असा सवाल उपस्थित होत आहे .GODFATHER: Coincidence … All those arrested in Mansukh Hiren case have links with Shiv Sena; Uddhav Thackeray is the Godfather
विरोधकांनी देखील सेनेला धारेवर धरलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत या सर्व गोष्टींमागचे खरे गॉडफादर हे उद्धव ठाकरेच असल्याचं म्हटलंय.
मनसुख हिरेन आणि अँटेलिया प्रकरणात अटकेत असलेल्या किंवा चौकशी सुरु असलेले सर्व शिवसेनेशी संबंधित आहेत हे कसं काय? हा योगायोग नक्कीच असू शकत नाही. आपण सर्वजण विचार करत आहोत की यामागचा खरा सूत्रधार कोण असेल? याचे खरे सूत्रधार उद्धव ठाकरेच आहेत असं ट्विट नितेश राणेंनी केलंय.
दरम्यान या प्रकरणात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना मंत्री अनिल परब यांच्या पार्टनरच्या ओळखीतून हिरेन यांच्या हत्येसाठी गाडी पुरवण्यात आल्याचाही आरोप केला आहे.
दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. वाझेंच्या पाठीमागे शर्मांचा ब्रेन होता हे सर्वश्रुत होतं. अँटेलिया आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणातील अनेक बाबी प्रदीप शर्मा यांच्या अडचणीतून समोर येतील असं दरेकर म्हणाले.
दरम्यान,या प्रकरणात NIA ने आतापर्यंत सचिन वाझे, रियाज काझी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली आहे. याव्यतिरीक्त महाराष्ट्र एटीएसनेही याआधी मनसुख हत्येचा तपास करताना माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदेला अटक केली होती.
NIA ने दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी नियोजन करण्यात प्रदीप शर्मांचा मोलाचा वाटा होता.