- गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तृणमूल काँग्रेस उतरणार आहे.Goa Assembly Election: Now Didi will be on Goa ground! Big announcement of Trinamool Congress
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार आहेत. 2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबह, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.यातच तृणमूल काँग्रेसने मोठी घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तृणमूल काँग्रेस उतरणार अशी घोषणाच आज तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केली.Goa Assembly Election: Now Didi will be on Goa ground! Big announcement of Trinamool Congress
गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आपले उमेदवार उतरवणार आहे. डेरेक ओ ब्रायन यांनी त्याबाबत शनिवारी घोषणा केली. तृणमूल काँग्रेस लवकरच आपला गोव्यातील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करेल. आम्ही गोव्यातील सत्ताधारी भाजपचे मोठे प्रतिस्पर्धी आहोत.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील पक्षात कोणतीही एकाधिकार शाही नाही. त्या गोव्यात विश्वसनीय स्थानिक नेत्यांना मैदानात उतरवतील अशी माहितीही डेरेक ओ ब्रायन यांनी दिली आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइजिन्हो फलेरो यांच्या नावाची चर्चा
काँग्रेस आमदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइजिन्हो फलेरो हे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Assembly Election: Now Didi will be on Goa ground! Big announcement of Trinamool Congress