• Download App
    दोन वर्षांत देशभरात वाहन चालकांची टोलनाक्यांवरील गर्दी, विलंबापासून सुटका | The Focus India

    दोन वर्षांत देशभरात वाहन चालकांची टोलनाक्यांवरील गर्दी, विलंबापासून सुटका

    • नितीन गडकरींची घोषणा; रशियाच्या मदतीने जीपीएस प्रणाली लागू केल्यानंतर उत्पन्नातही मोठी वाढ अपेक्षित

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पुढील दोन वर्षांत नवी प्रणाली लागू केली की राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवरील गर्दी आणि विलंबापासून वाहन चालकांची सुटका होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतुकीच्या संदर्भात ही मोठी घोषणा केली आहे.

    Global Positioning System (GPS) will ease travlers toll collection on national hiways, says nitin gadkari

    केंद्र सरकार रशियाच्या मदतीने Global Positioning System (GPS) टेक्नोलॉजीचा वापर केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे टोल उत्पन्न 5 वर्षांमध्ये 1.34 कोटींपर्यंत वाढणार आहे. यासंदर्भात संबंधित विभागांची नुकतीच एक बैठक झाली असून त्यात सादरीकरण करण्यात आलं आहे. त्यात हे स्पष्ट करण्यात आले.

    गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारने वाहनांना फास्ट टॅग सक्तीचे केले होते. त्यामुळे इंधनातही मोठी बचत झाली. मात्र अजुनही अनेक वाहनांनी फास्ट टॅग लावलेले नाही. कॅशलेस व्यवहारामुळे पारदर्शकता येईल आणि भ्रष्टाचारही कमी होणार आहे.

    केवळ फास्ट टॅगमुळे उत्पन्नात 70 कोटींवरून 90 कोटींपर्यंत वाढ झाली आहे. टोल नाक्यांच्या व्यवहारात प्रचंड गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारीही कायम होतात. त्यावर नाराजीही व्यक्त होते. यात सुधारणा करून काहीतरी नवी प्रणाली तयार करण्याचाही आग्रह होता. त्यानुसार जीपीएस प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

    Global Positioning System (GPS) will ease travlers toll collection on national hiways, says nitin gadkari

    सर्वाधिक गर्दीचं शहर असलेल्या मुंबईत तर टोल नाक्यांमुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा येत असतो. ही नवी प्रणाली सक्षमपणे लागू झाली तर टोलनाक्यांवरील विलंबापासून गर्दीपर्यंतच्या सगळ्या कटकटींपासून वाहन चालकांची सुटका होणार आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…