मजुरी करणाऱ्या वडलांची ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाईल घेऊन देण्याची ऐपत नसल्याने विद्यार्थींनीने आत्महत्या केली.
विशेष प्रतिनिधी
नांदेड : मजुरी करणाऱ्या वडलांची ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाईल घेऊन देण्याची ऐपत नसल्याने विद्यार्थींनीने आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे हा करुण प्रकार घडला. सतरा वर्षीय बुद्धीशी पोटफोडे असे मयत तरुणीचे नाव आहे Girl Student commits suicide as father does not bring mobile phone for study due to poverty
दहावीत 75 टक्के गुण मिळविल्यानंतर बारावीत आणखी चांगले यश मिळविण्यासाठी काही दिवस मैत्रिणींच्या मोबाईल वरून ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने वडिलांना मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट केला. परंतु मजुरी करणाऱ्या वडिलांची मोबाईल घेण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे हताश झालेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दहावीला 75 टक्के मार्क मिळवणाऱ्या बुद्धिशीला बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा होता, त्यासाठी तिने मोबाईलचा हट्ट धरला होता. मात्र मजुरी करणारे तिचे वडील प्रकाश पोटफोडे हे तिला मोबाईल घेऊन देऊ शकले नाहीत. त्यामुळे हताश झालेल्या बुद्धीशी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.