पुण्याजवळील बोपदेव घाटामध्ये मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून तिची सोनसाखळी आणि रोख असा 26 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. Girl stabbed and looted in Bopdev ghat who was going for a walk with a friend
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्याजवळील बोपदेव घाटामध्ये मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून तिची सोनसाखळी आणि रोख असा 26 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकरणी आरिफ शेख (वय 29, रा. पुणे स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. आरिफ शेख आणि त्यांची मैत्रीण बोपदेव घाटामध्ये फिरायला गेले होते. घाट उतरत असताना त्याची मैत्रीण नैसर्गिक विधीसाठी गेली.
त्यावेळी त्या ठिकाणी तीन आरोपी आले. त्यांनी या तरुणीवर धारदार चाकूने वार करून तिचे सोनसाखळी आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Girl stabbed and looted in Bopdev ghat who was going for a walk with a friend
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
- शबरीमला मंदिरात वडिलांसोबत दर्शनास जाण्याची अल्पवयीन मुलीला परवानगी
- मराठवाड्यात सर्वदूर बरसल्या श्रावणधारा, पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान
- महाराष्ट्र ठरले एक कोटी जनतेला दोन्ही डोस देणारे देशातील पहिले राज्य
- राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल