• Download App
    कृषी कायद्यांना पाठिंबा दिला नाही ; कमल हसनचा शिलेदार भाजप गोटात | The Focus India

    कृषी कायद्यांना पाठिंबा दिला नाही ; कमल हसनचा शिलेदार भाजप गोटात

    विशेष प्रतिनिधी 

    चेन्नई: केंद्राच्या कृषी कायद्यांना कमल हसनने पाठिंबा दिला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या त्याचा शिलेदार भाजपच्या गोटात दाखल झाला. अरुणाचालम, असे त्या शिलेदाराचे नाव आहे. हम बने तुम बने एक दुजे के लिये, या गाण्याच्या चालीवर हिंदोळे घेणारा कमल हसन आणि अरुणाचालम हा दो हंसो का जोडा आता विभक्त झाला आहे. General secretary of Kamal Haasan’s party joins BJP ahead of Tamil Nadu polls

    कमल हसन याने दोन वर्षपूर्वी 21 फेब्रुवारी 2018 रोजी तामिळनाडूत मक्कळ निधी मैअंम हा राजकीय पक्ष स्थापन केला होता. त्याच्या उपाध्यक्षपदाची धुरा अरुणाचालम यांच्या खांद्यावर सोपविली होती. आता हा खांदा निखळला आहे. General secretary of Kamal Haasan’s party joins BJP ahead of Tamil Nadu polls


    आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कमल हसन याने राजकारणाचे फासे खेळण्याची जोरदार तयारी केली आहे. जोडीला रजनीकांत याच्याशी सूत जुळविले आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर त्याचा उजवा हात निखळला आहे.

    General secretary of Kamal Haasan’s party joins BJP ahead of Tamil Nadu polls

    भाजपच शेतकऱ्यांचा कैवारी

    हम बने तुम बने एक दुजे के लिये, या गाण्याच्या चालीवर हिंदोळे घेणारा कमल हसन आणि अरुणाचालम हा दो हंसो का जोडा आता विभक्त झाला आहे. हंस हा पक्षी दूध आणि पाणी वेगळे करतो, असे म्हणतात. तो फक्त दूध पितो, असे म्हटले जाते. याचा विचार केला तर अरुणाचालम यांनी हसन यांची साथ सोडून हंसाप्रमाणे शेतकऱ्यांच हित पाहणारा भाजप जवळ केला आहे.

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!