• Download App
    GANPATI BAPPA MORYA 2021: मुख्यमंत्र्यांच्या घरी 'बाप्पा' विराजमान ! नितीन गडकरींच्या बाप्पाची प्रतिष्ठापना तुम्ही फोटो बघितले का? GANPATI BAPPA MORYA 2021: 'Bappa' at CM's house! Did you see the photo of Nitin Gadkari's Bappa ?

    GANPATI BAPPA MORYA 2021: मुख्यमंत्र्यांच्या घरी ‘बाप्पा’ विराजमान ! नितीन गडकरींच्या बाप्पाची प्रतिष्ठापना ; तुम्ही फोटो बघितले का?

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : आज श्री गणेश चतुर्थी … गणरायाचं आगमन झाल्याने सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांच्या घरी लाडक्या बाप्पा विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.GANPATI BAPPA MORYA 2021: ‘Bappa’ at CM’s house! Did you see the photo of Nitin Gadkari’s Bappa ?

    जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज वर्षा येथे मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्यात आली, यावेळी राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही नागपुरातील घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. नितीन गडकरी यांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याही घरी गणरायाचं आगमन झालं आहे.

    राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानीही गणरायाचे आगमन झाले. राजेश टोपेंनी ट्विट करत म्हटलं, सहकुटुंब सहपरिवारासह गणपती बाप्पाची स्थापना केली. श्री गणेशाची आराधना करताना राज्यातील कोरोनाचे संकट दूर करून जनतेला सुखात ठेवण्याची  श्री चरणी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया..!!!

     

    GANPATI BAPPA MORYA 2021: ‘Bappa’ at CM’s house! Did you see the photo of Nitin Gadkari’s Bappa ?

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार