• Download App
    गणेश चतुर्थीला जगातील सर्वात स्वस्त फोन येणार, मुकेश अंबानी यांची घोषणा; गुगल, जिओची निर्मिती Ganesh Chaturthi will get the cheapest phone in the world, Mukesh Ambani's announcement; Created by Google, Geo

    गणेश चतुर्थीला जगातील सर्वात स्वस्त फोन येणार, मुकेश अंबानी यांची घोषणा; गुगल, जिओची निर्मिती

    वृत्तसंस्था

    जामनगर : गणेश चतुर्थीला जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोन आणणार आहे, अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी आज केली. गुगल आणि जिओची यांनी संयुक्तरित्या त्याची निर्मिती केली आहे. Ganesh Chaturthi will get the cheapest phone in the world, Mukesh Ambani’s announcement; Created by Google, jio

    रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ते म्हणाले की गूगल आणि जिओने संयुक्तपणे जिओ फोन नेक्स्ट तयार केला आहे. हा एक संपूर्ण फिचर स्मार्ट फोन आहे. हा स्मार्टफोन भारत आणि जगभरातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असणार आहे.

    १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून हा फोन बाजारात उपलब्ध होईल. भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार केलेल्या जियोफोन नेक्स्ट स्मार्टफोनवर वापरकर्ते गुगल प्ले वरून अॅप्स डाउनलोड करू शकतात. स्मार्टफोनला सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा मिळतील. मुकेश अंबानी यांनी संपूर्णपणे फिचर स्मार्टफोनचे वर्णन केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून केले आहे. कोरोना महामारी असूनही कंपनीचा लाभांश वाढला आहे, असे अंबानी म्हणाले. तर निता अंबानी म्हणाल्या, कोरोना साथीच्या वेळी लोकांना मदत करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनकडून बरीच कामे केली आहेत.

    सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर बनला

    रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर बनल्याचे कंपनीने सांगितले आहे. केवळ मागील वर्षात डेटा खपातील ही ४५% वाढ आहे. शिवाय, वापरकर्त्यांनी दरमहा ६३० कोटी जीबी वापरल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

    मुकेश अंबानी यांनी खुलासा केला की, रिलायन्स जिओने या वर्षात ३७.८ दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडले आहे. कंपनी आता ४२५ दशलक्षाहूनही अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा ८६,४९३ कोटी रुपये आहे.

    Ganesh Chaturthi will get the cheapest phone in the world, Mukesh Ambani’s announcement; Created by Google, jio

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…