• Download App
    अफगाणिस्तानचा माजी मंत्री बनलाय जर्मनीत चक्क फूड डिलीव्हरी बॉय Former minister became food delivery boy in Germany

    अफगाणिस्तानचा माजी मंत्री बनलाय जर्मनीत चक्क फूड डिलीव्हरी बॉय

    विशेष प्रतिनिधी

    बर्लिन – तालिबानच्या भीतीने देश सोडून अधिक चांगले आयुष्य जगण्यासाठी अनेक नागरिक अफगाणिस्तान सोडून इतर देशांमध्ये आश्रयाला जात असून पडेल ती कामे आनंदाने करीत आहेत. यात चक्क मंत्रीही मागे नाहीत. जर्मनीमध्ये आलेल्या अफगाणिस्तानच्या एका माजी मंत्र्यालाही असाच अनुभव आला असून त्यांना सध्या ‘फूड डिलिव्हरी’चे काम करावे लागत आहे. Former minister became food delivery boy in Germany

    सय्यद अहमद शाह सआदत असे त्यांचे नाव आहे. अश्रफ घनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये २०१८ मध्ये माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. दोन वर्षे ही जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. डिसेंबर २०२० मध्ये ते जर्मनीत आले. तालिबानचे वर्चस्व वाढत असल्याचे पाहून त्यांनी देश सोडला होता. सध्या ते जर्मनीमधील लेपझिग येथे निर्वासित म्हणून रहात आहेत. पैशांची कमतरता भासू लागल्याने त्यांनी फूड डिलिव्हरी बॉयचे काम पत्करले आहे.

    ग्राहकाला पिझ्झा देण्यासाठी जात असतानाचे त्यांचे छायाचित्र एका स्थानिक पत्रकाराने काढले. हे त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहे. सआदत यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये दोन पदव्युत्तर पदव्या मिळविल्या आहेत. त्यांनी दळणवळण क्षेत्रातही अनेक वर्षे काम केले आहे. १३ देशांतील २० बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.

    Former minister became food delivery boy in Germany

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध

    मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??