विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील १८ महापालिकांची मुदत २०२२ मध्ये संपत आहे. या महापालिकांच्या प्रभाग रचनेची तयारी करण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. याबाबतचे आदेश आयोगाकडून बुधवारी काढण्यात आले. राज्य शासनाच्या निर्णयानुसार एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना आदेश बजाविले आहेत. Formation of one member ward for municipal elections, preparation by Election Commission
या आदेशानुसार सध्या तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी एक सदस्यीय वॉर्ड रचना सुरू करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि. 25) सन 2022 रोजी मुदत संपुष्टात येत असलेल्या राज्यातील 18 महापालिकांच्या आयुक्तांना आदेश बजावला.
पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महापालिकांची मुदत 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. या महापालिकांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने प्रारुप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 31 डिसेंबर 2019 रोजी राज्य शासनाने राज्यातील महापालिकांमधील बहुसदस्यीय पद्धत बंद करून एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती. शासनाच्या या निर्णयानुसार महापालिकांच्या वॉर्ड रचनेचा प्रारुप आणि कच्चा आराखडा तयार करण्याबाबत सूचविण्यात आले आहे. सन 2011 ची जनगणना विचारात घेऊन मतदारसंख्या निश्चित केली जाणार असून, अद्ययावत मतदार याद्याही तयार करण्याबाबत सूचविले आहे. प्रभागाची प्रारूप रचनेचे काम 27 ऑगस्टपासून हाती घेण्यात यावे तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत. अंतिम प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम यथावकाश निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाईल, असेही या आदेशात म्हटले आहे.
राज्य शासनाचा अंतिम निर्णय महत्त्वाचा डिसेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग रचनेचे काम हाती घेतले असले तरी मुंबई वगळता इतर ठिकाणी द्विसदस्यीय प्रभाग रचना करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये खलबते सुरू आहेत. राज्य शासनाने नजीकच्या काळात निर्णय घेतल्यास तसेच त्याला विधीमंडळाची मान्यता मिळाल्यास सध्या बनविण्यात येणाऱ्या प्रारूप एकसदस्यीय प्रभाग रचनेला अंतिम रुप देताना दोन प्रभाग एकत्र करून द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनेही निवडणूका होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय राज्य सरकारवर अवलंबून राहणार आहे.
Formation of one member ward for municipal elections, preparation by Election Commission
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबचे झाले थोडे, तोच छत्तीसगडमधून आले “वादाचे घोडे”; मुख्यमंत्री भूपेश बघेलांविरुद्ध मंत्री टी. एस. सिंगदेव यांचे बंड
- दुबईमध्ये उघडेल आता जगातील सर्वात उंच ऑब्जर्वेशन व्हील , लंडन आयच्या उंचीपेक्षाही असेल दुप्पट
- अफगाणिस्तानच्या आयटी मंत्र्यांवर जर्मनीत पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ, मंत्रिपदी असताना देशात सेल फोन नेटवर्क वाढवले
- केवळ ४००० अमेरिकी नागरिक आणायचे होते, मग २६,००० एअरलिफ्ट कसे केले? दहशतवादी तर आणले नाहीत ना? ट्रम्प यांची बायडेन सरकारवर कडाडून टीका