• Download App
    For the longevity of the Prime Minister Mahamrityunjaya chanting at Banda

    WATCH : पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी बांदा येथे महामृत्यूंजय जप भाजयुमोतर्फे सिंधुदुर्ग येथे कार्यक्रम

    विशेष प्रतिनिधी

    बांदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे याकरिता महाराष्ट्राचे प्रवेशद्वार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील बांदेश्वर मंदिरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महामृत्यूंजय जप करण्यात आला. For the longevity of the Prime Minister Mahamrityunjaya chanting at Banda

    बांदेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदे शाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सहकार्‍यांसह श्री बांदेश्वरच्या चरणी साकडं घातलं आणि पंतप्रधानांची देशाच्या कल्याणासाठी आवश्यकता असल्याने त्यांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना केली.

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण केली आहे. आज जगाचा आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अशावेळी त्यांच्या बाबतीत काहीतरी घातपात घडवून आणण्याचा लाजीरवाणा प्रयत्न पंजाब काँग्रेसने केला होता.

    काँग्रेसने असे हिन पातळीचे राजकारण करू नये, त्यांना ईश्वर सुबुद्धी देवो आणि नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली.

    याप्रसंगी प्रदेश सचिव अमृत मारणे, सुजित थिटे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष भाई सावंत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व बांदा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

    •  पंतप्रधानांसाठी बांदा येथे महामृत्यूंजय जप
    •  भाजयुमोतर्फे सिंधुदुर्ग येथे कार्यक्रम
    •  श्री बांदेश्वरच्या चरणी भाजयुमोतर्फे साकडं
    •  काँग्रेसला ईश्वर सुबुद्धी देवो अशी प्रार्थना
    •  बांदा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार मानले जाते
    •  बांदेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान आहे

    For the longevity of the Prime Minister Mahamrityunjaya chanting at Banda

    Related posts

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!

    Operation Sindoor : फेक न्यूज पसरवायला, पाकिस्तान पाठोपाठ चीन देखील सरसावला!!

    Operation sindoor : भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे संघाकडून अभिनंदन आणि देशवासीयांना आवाहन!!