विशेष प्रतिनिधी
उस्मानाबाद – महाराष्ट्रात एका गावात फक्त गाजराची शेती केली जाते, असे सांगितले तर आश्चर्य वाटेल. पण, ही खरी गोष्ट आहे.राज्यात गाजराचे गाव म्हणून उस्मानाबादच्या परंडा तालुक्यातील भांडगावची ओळख आहे. कारण येथील शेतकरी पिढ्यानपिढ्या गाजराचे उत्पादन घेत आले आहेत. For carrot farming Introduction to Bhandgaon
महाराष्ट्रात नागपूर संत्रीसाठी , नाशिक द्राक्ष, कांद्यासाठी तर पैठण मोसंबीसाठी म्हणून परिचित आहे. त्याप्रमाणे परंपरिक रब्बी पिकामुळे गाजराचे गाव म्हणून नवी ओळख बार्शीपासूनन १५ कि मी अंतरावर असलेल्या भांडगावची होत आहे.
या गावात साधारण दोनशे हेक्टरवर सेंद्रीय पद्धतीने रब्बी पिक म्हणून गाजर उत्पादन घेतले जात आहे . अत्यल्प पाणी , फवारणी , खत लागत नाही . खुरपणी नाही. गाजर काढणीतून महिलांना रोजगार , जनावरांना चारा मिळतो तसेच कमी खर्चात एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे गाजर शेती वाढत असल्याचे शेतकरी धनंजय अंधारे यांनी सांगितले .
- गाजराच्या शेतीसाठी भांडगावची ओळख
- राज्यात फक्त गाजराची शेती होते
- शेतकऱ्यांकडे पिढ्यानपिढ्या गाजर शेतीची परंपरा
- दोनशे हेक्टरवर सेंद्रीय पद्धतीने रब्बी पिक गाजर
- अत्यल्प पाणी , फवारणी , खतही लागत नाही
- गाजर काढणीतून महिलांना रोजगार
- जनावरांना चारा देखील मिळतो
- एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न मिळत आहे