वृत्तसंस्था
कर्जत : प्रसिद्ध एन.डी. स्टुडिओला आज दुपारी आग लागली . ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्तीच्या गोडाऊनला आग लागली. Fire at ND Studio of nitin desai at karjat
आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोळ उंच आकाशामध्ये पसरल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. एनडी स्टुडिओतील जोधा अकबर सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली .
फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या घटनास्थळी आल्या आहेत. त्याच्यामाध्यमातून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आगीत स्टुडिओचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समजलेले नाही.दरम्यान, काेराेनामुळे सध्या एनडी स्टुडीओमध्ये चित्रकरण बंद हाेते. त्यामुळे माेठ्या प्रमाणातील जीवीत हानी टळली आहे.
Fire at ND Studio of nitin desai at karjat
महत्त्वाच्या बातम्या
- सनी लियोनी कामगारांसाठी करणार हे काम, दहा हजार जणांना देणार जेवण
- लष्करासाठी क्रांतीकारी निर्णय, लष्करी अधिकाऱ्यांना सचिव स्तराचे अधिकार, फाईलींचा निपटारा जलदगतीने होणार
- बड्या वृत्तसमुहांकडून फेक न्यूजद्वारे योगी आदित्यनाथांची बदनामी, म्हणे गोशाळांमध्ये गाईंची कोरोना तपासणी करण्याचे काढले आदेश
- पाकिस्तानात कोरोनाचा उद्रेक, अनेक प्रांतात पूर्ण लॉकडाऊन, बंदोबस्तासाठी लष्कर तैनात