• Download App
    अपयशाची भीती हाच यशाचा खरा शत्रू|Fear of failure is the real enemy of success

    लाईफ स्किल्स: अपयशाची भीती हाच यशाचा खरा शत्रू

    मी नापास झालो तर? मला नकार मिळाला तर? माझा अपमान झाला तर? अश्या पद्धतीची खूप सगळी भीती सेकंदाला शंभरदा येते आणि आपण आव्हानच स्वीकारत नाही. लढण्याआधीच हरतो. यावर उपाय म्हणजे मला अपयश येईल असा विचार येऊ देऊ नका. ती भीती मोडा. आव्हानाला सामोरे जा. यश नक्कीच पदरात पडेल. किमान असा विश्वास तरी ठेवा. काय लढून फायदा? तसेही आपण हरणारच आहोत!Fear of failure is the real enemy of success

    असा विचार केला असता तर कदाचित ना अंबानींचा मोठा उद्योगसमूह उभा राहिला असता पारशी लोकांच्या उद्योगाच्या मक्तेदारीत, ना अमिताभ बच्चन बिग बी झाला असता जर तो त्याच्या मित्रांच्या निंदा आणि टीकांनी घाबरला असता. असे अनेक आहेत जे आवाहनाला घाबरले नाहीत आणि त्यांना स्वीकारून संधीच सोन केलं. नापास होण्याला, धाडसी निर्णय घेण्याला, स्टेजवर जाऊन भाषण द्यायला,

    उद्योग करायला, मनातली गोष्ट सांगायला, गैरसमज स्पष्ट करायला, नकार द्यायला, अयशस्वी होण्याला कधीच घाबरू नका. शेवटी होऊन जास्तीतजास्त काय होईल याचा विचार करा. आयुष्य संपणार तर नाही ना. मग काय हरकत आहे स्टेजवर जाऊन आपल्या मनातले विचार बोलून दाखवायला. धाडस करा आणि तुम्ही तुमच्या जीवनाचे राजे असाल.

    सचिन तेंडुलकर कित्येकदा ९९ धावांवर बाद झाला पण म्हणून त्याने पुन्हा शतक करण्याचा प्रयत्न सोडला नाही. एखादी गायन किंवा वादन कला हि सुद्धा सरावानेच वाह:वाहीच्या योग्य होते. सातत्य, हा एकच उपाय आहे कमतरता असली तरी टिकून राहण्यासाठी. यश मिळवण्यासाठी.

    Fear of failure is the real enemy of success

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!