• Download App
    बारामतीत काळ्या बुरशीची धास्ती ; दहा दिवसांत 19 जणांवर शस्त्रक्रिया Fear about Black Fungus in Baramati; Surgery on 19 people in ten days

    बारामतीत काळ्या बुरशीची धास्ती ; दहा दिवसांत 19 जणांवर शस्त्रक्रिया

    वृत्तसंस्था

    बारामती : बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू आहेत. दुसरीकडे ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. Fear about Black Fungus in Baramati; Surgery on 19 people in ten days

    गेल्या दहा दिवसांत म्युकरमायकोसिसच्या 19 रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. म्युकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. तो कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीला आणि ज्याला मधुमेह आहे, अशा व्यक्तींना होतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने अधिक काळजी घेण्याची गरज असून तसा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कोरोनाची लागण एखाद्याला होते.



     

    तेव्हा त्याला स्टिरॉइड दिली जातात. त्यामुळे म्युकरमायकोसिस आजार होण्याचे ते एक प्रमुख कारण असल्याचे तज्ञाचे मत आहे. परंतु हा एक जीवघेणा आणि संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. दरम्यान, म्युकरमायकोसिस आजाराचा धोका बारामतीत वाढल्याने प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे. त्यांनी आजार रोखण्यासाठी पावले उचलली आहेत.

    म्युकरमायकोसिस बाबत….

    •  बारामतीत म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले
    •  गेल्या दहा दिवसात १९ जणांवर शस्त्रक्रिया
    •  म्युकरमायकोसिसचा धोका वाढल्यानं प्रशासन झाले अलर्ट
    •  लक्षणं आढळल्यास त्वरीत उपचार घेण्याचं आवाहन

     

    Fear about Black Fungus in Baramati; Surgery on 19 people in ten days

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मनोज जरांगेंच्या आंदोलनात पवार + ठाकरेंचे नेते घुसले; पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाबाबत पवार + ठाकरेंची भूमिका संशयाच्या घेण्यात!!

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??