मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली. ईडीने अब्दुल्ला यांची 11.86 कोटींची संपत्ती शनिवारी जप्त केली. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे.
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली. ईडीने अब्दुल्ला यांची 11.86 कोटींची संपत्ती शनिवारी जप्त केली. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे.
Farooq abdullah assets worth Rs 12 crore seized from ED
जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये अब्दुल्ला यांची 3 घरे, 2 प्लॉट आणि एका व्यावसायिक मालमत्तेचा समावेश आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी याबद्दलची माहिती दिली आहे. या संपत्तीचे शासकीय मूल्य 11.86 कोटी दाखवण्यात आले आहे. मात्र तिचे बाजार मूल्य 60-70 कोटी रुपये आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अब्दुल्ला यांची अनेकवेळा चौकशी केली आहे. ऑक्टोबरमध्ये श्रीनगर येथे त्यांची शेवटची चौकशी झाली होती. 2005 ते 2011 दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून 109.78 कोटी रुपये मिळाले होते. त्यांच्यावर पदाचा गैरवापर करणे, बेकायदेशीर नियुक्त्या करणे आणि मनी लॉन्ड्रिंगच्या उद्देशाने पदाधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार देण्याचा आरोप आहे.
Farooq abdullah assets worth Rs 12 crore seized from ED
फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र उपर अब्दुल्ला म्हणाले की, जप्त केलेली संपत्ती वडिलोपार्जित आहे. यातील अनेक 1970 च्या काळातील आहेत.